MLC election Maharashtra मे मध्ये रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या 9 जागासह राजीनामा मुळे रिक्त झालेल्या 10 जागांसाठी 12 मेला निवडणूक

MLC Election Maharashtra 2026
विधान परिषद सदस्य उद्धव बाळासाहेब ठाकरे, संजय केनेकर, नीलम गोरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजीत सिंह मोहिते पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे अशा सर्वपक्षीय नव सदस्यांचा कार्यकाल हा 13 मे 2026 रोजी संपणार आहे.
विधान परिषदेच्या या पार पाडल्या जाणाऱ्या निवडणुकीची आदिशूचना 23 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून उमेदवारांना 30 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची छाननी शनिवार दोन मे 2026 रोजी पार पाडली जाणार असून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी चार मे 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर 12 मे 2026 रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
विधान परिषद निवडणूक 2026 या रिक्त असलेल्या दहा जागांची निवडणूक प्रक्रिया ही 13 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.


