शेतकऱ्यांना मोठा दिलासा अखेर केंद्र शासनाची खात अनुदान योजना ( NBS Scheme 2026 ) राबविण्यास मंजुरी; खताची भाव वाढ टळली

NBS Scheme 2026 for Kharif
खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम २०२६ साठी खत अनुदान योजना अर्थात NBS (Nutrient Based Subsidy) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती वाढल्या असल्या तरी, भारतीय शेतकऱ्यांना मात्र आहे त्याच जुन्या दरात खते मिळणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक निर्णय ०८ एप्रिल २०२६
कोणत्या खतांवर मिळणार अनुदान ( NBS Scheme 2026 )
NBS योजनेअंतर्गत नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) आणि गंधक (S) यांसारख्या पोषक तत्वांवर आधारित खतांना अनुदान दिले जाते. DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट), NPK चे विविध ग्रेड्स २८ प्रकारची विविध मिश्र खते.


