Kerosene Vatap या राशन कार्ड धारकांना 3 लिटर रॉकेल वाटप

राज्यातील AAY PHH राशन कार्ड धारकांना होणार प्रति कुटुंब ३ लिटर रॉकेल वाटप Kerosene Vatap

Kerosene Vatap

KEROSENE VATAP UPDATE

सध्या सुरू असलेल्या भू राजकीय परिस्थिती व गॅस टंचाई च्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात अंत्योदय व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना मिळणार प्रति कुटूंब 3 लिटर केरोसीन वाटप केले जाणार आहे.

जागतिक स्तरावरील भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी  गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत.
राज्यासाठी ३७७४ किलो लिटर केरोसीन मंजूर केले आहे.

या उपलब्ध कोट्यातून रेशन कार्डधारकांना आता प्रति कुटुंब 3 लिटर केरोसीन वाटप केले जाणार आहे. ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांना गॅस टंचाईमुळे अडचणी येत आहेत, त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

ग्रामीण भागातील प्राधान्य गटः अंत्योदय  आणि प्राधान्य कुटुंब  रेशनकार्ड धारकांना वितरणात प्रथम प्राधान्य मिळणार असून तदनंतर उपलब्धतेनुसार शुभ्र शिधापत्रिकाधारक यांना हे केरोसिन वाटप केले जाणार आहे. याचप्रमाणे रॉकेल शिल्लक राहिल्यास रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांनी ग्रामपंचायतीचा ‘रहिवासी दाखला’ दिल्यास, स्थलांतरित मजूर यांनी आपले केंद्र किंवा राज्य शासनाचे ओळखपत्र दाखवून कुटुंबाला/रेशनकार्डला 3 लिटर केरोसीन घेता येणार आहे.

नागरिकांनी आपल्या जवळच्या रास्त भाव धान्य दुकानात संपर्क साधून आपली मागणी नोंदविण्याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. या केरोसीनचा वापर केवळ आणि केवळ घरगुती इंधनासाठीच व्हावा. पेट्रोल किंवा डिझेलमध्ये भेसळीसाठी याचा वापर झाल्यास ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955’ अंतर्गत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा ही प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

https://www.prabhudevalg.com/2026/03/kerosin-on-ration.html