Farmer Id Authorize शासनाचा मोठा बदल; आता देता येणार अधिकार

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे कागदपत्र म्हणजे Farmer ID, या Farmer ID Authorize मध्ये आता शेतकऱ्यांना आपले Authorised प्रतिनिधी नेमता येणार आहेत. पहा सविस्तर काय आहेत बदल.

Farmer Id Authorize

Farmer ID Authorize Option

राज्य शासनाच्या माध्यमातून फार्मर आयडी मध्ये मोठा आणि दिलासादायक बदल करण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक योजना नुकसान भरपाई,पीक कर्ज काढण्यासाठी, पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. आता रासायनिक खतं खरेदी करताना सुद्धाफार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे.

यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आहे त्यांना हे सर्व करणे शक्य मात्र ज्याचा फार्मर आयडी नाही, जे भाडे कराराने जमीन करतात त्यांना लाभ कसा मिळणार हा प्रश्न होता.

यावरच आता एक सोप्पं पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो म्हणजे फार्मर आयडी मध्ये अधिकृत प्रतिनिधी अर्थात Farmer ID Authourize Representative नेमण्याची तरतूद. यामध्ये शेतकऱ्यांना आता आपल्यासह किव्हा आपल्याशिवाय एक अधिकृत प्रतिनिधी नेमता येणार आहे.

यामुळे या नेमलेल्या प्रतिनिधीला पीकविमा भरणे, पीककर्ज घेणे किव्हा हमीभाव खरेदी नोंदणी करणे या बाबी करता येणार आहेत.

खाली दिलेल्या विडिओ मध्ये हि अधिकृत प्रतिनिधी नेमण्याची प्रक्रिया दाखविण्यात आलेली आहे, ती पाहून आपण हि आपला अधिकृत प्रतिनिधी नेमू शकता कोणाला अधिकार द्यायचे असतील तर देऊ शकता.