कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीशाळा चे आयोजन; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन. पहा कसे असेल वेळापत्रक Digital Shetishala 2026

Digital Shetishala NDKSP & Pani Foundation
२ रि डिजिटल शेतीशाळा ८ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यामध्ये जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे या बाबींचा समावेश असणार आहे.
याचप्रमाणे १५ एप्रिल २०२६ रोजी ३ रि डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन- सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटकांचे संवर्धन, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर या बाबींचा समावेश असणार आहे.
तर ४ थ्या शेतीशाळेत भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र- भाताची थेट पेरणी (डीएसआर), श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
या सर्व शेतीशाळा नियोजित तारखेला सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील. या शेतीशाळांचे प्रसारण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाऊंडेशन व उमेदच्या YouTube channel वरुण होणार आहे.
शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट, वनपट्टेधारक या सर्वांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात येत आहे.


