NFBS Scheme 2026 काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना; लाभ, पात्रता, कागदपत्र

काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना; लाभ, पात्रता, कागदपत्र काय लागतात जाणून घेऊयात सविस्तर NFBS Scheme 2026

NFBS Scheme

NFBS Scheme राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाचे अशी योजना आहे जी राज्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाते ज्याच्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील जर एखाद्या प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो याचा जर मृत्यू झाला तर त्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाला एक आधार म्हणून आर्थिक साह्य म्हणून आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एक वेळची आर्थिक मदत देते ज्याच्या अंतर्गत त्या कुटुंबाला एक रकमे 20000 रुपयांचं अनुदान दिलं जातं.

राज्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे नेमकी योजना काय आहे कशाप्रकारे राबवली जाते याच्यासाठी कागदपत्र काय लागतात अर्ज कसा केला जातो अनुदान किती दिल जात याच्यासाठीच्या अटी शर्ती आणि पात्रता या सर्वांबद्दल सविस्तर या लेखांमधून पाहण्याचा प्रयत्न करूया

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमुळे जर एखाद्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावते व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला एक मस्त आर्थिक साह्य दिल्या जातात ज्यामुळे त्या कुटुंबातील इतर सदस्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत होते. या कुटुंबाला एकमुस्त दिलेल्या लाभांमुळे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एक तात्काळ मदत मिळते कमावती व्यक्ती गेल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी या लाभाची मदत होते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना पात्रता निकष

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी ते कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असावं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दिलेल्या मर्यादेत असणं गरजेचे आणि याच्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार आहे या योजनेचा लाभ घेत असताना प्रमुख कमावते व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लाभ दिला जातो कमावत्या व्यक्तीचं मृत्यूच्या वेळी वय हे 18 ते 59 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब हे महाराष्ट्रामध्ये किमान पंधरा वर्षापासून रहिवासी असाव रहिवासी पुरावा देखील सादर करावा लागणार आहे या योजनेच्या अंतर्गत ज्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती कारणामुळे झालेला आहे अशा कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो. मयत पावलेली व्यक्ती ही कुटुंबातील प्रमुख कमावती व्यक्ती असावी मग ती स्त्री किंवा पुरुष दोन्ही असेल तरी चालते मात्र ती व्यक्ती कुटुंबातील कमावती व्यक्ती असल्याबाबतचं एक प्रमाणपत्र सादर करावं लागतं.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आवश्यक कागदपत्र

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेत असताना खालील प्रमाणे कागदपत्र लागतील अर्ज करत असताना कुटुंब प्रमुखाचे मृत्यू प्रमाणपत्र हे जोडावं लागणार आहे ग्रामीण भागासाठी ग्रामसेवकांना विहित नमुन्यात दिलेलं एक प्रमाणपत्र ज्याच्यामध्ये मयत पावलेली व्यक्ती ही कमावती व्यक्ती आहे अशा प्रकारचा उल्लेख असेल जन्ममृत्यूच्या नोंदवहीच्या संबंधित पानाची झेरॉक्स प्रत.

नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रातील मयत व्यक्ती असेल तर मृत्यू प्रमाणपत्र मृत्यू नोंद रजिस्टर च्या पानाची छायांकित प्रत याचप्रमाणे ज्या कुटुंबातील लाभासाठी अर्ज केलेला आहे त्या कुटुंबप्रमुखाचं आधार कार्ड आणि जन्माचा पुरावा ज्याच्यामध्ये जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला टीसी असेल तर टीसी.

अर्जदार जो असेल त्या अर्जदाराचे आधार कार्ड आणि त्या अर्जदाराचा जन्माचा जन्म तारखेचा पुरावा ज्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र वगैरे ही कागदपत्र चालते दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचा एक पुरावा सादर करावा लागेल तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांचा माध्यमातून दिलेला उत्पन्नाचा दाखला दारिद्र रेषेखालील यादी मध्ये साक्षांकित उतारा आणि जर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड ही कागदपत्र लागतील.

तहसीलदार/उपविभागीय अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्यरेषेखालील यादीचा साक्षांकित उतारा.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अर्ज कसा करावा

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो यासाठी अर्जदाराला आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन ( https://aaplesarkar.mahaonline.gov.in ) या संकेतस्थळावरती अर्ज करता येतो जर शक्य नसेल तर आपण आपल्या जवळच्या शेतुक केंद्रामार्फत देखील हा अर्ज भरू शकता अर्ज करत असताना सर्व कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड करावी लागतात.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने केल्यानंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुढे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते तपासणी दरम्यान काही त्रुटी असल्यास तो अर्ज परत पाठवला जातो त्याच्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी अर्जदाराला सांगितलं जातं अन्यथा सर्व व्यवस्थित असेल तर हा अर्ज मंजूर केला जातो आणि लाभार्थ्याला अर्थसहाय्याचं वितरण केलं जातं अर्जाची प्रक्रिया 30 ते 60 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण पार पाडली जाते.

कागदपत्रांची छाननी: १०-१५ दिवस, तहसीलदाराची मंजुरी: १५-३० दिवस, कागदपत्रांमध्ये कमतरता किंवा तांत्रिक अडचणींमुळे यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.