Winter Session 2025 हिवाळी अधिवाशनात ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात 75 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर. अतिवृष्टी, रब्बी अनुदान, नमो शेतकरीच काय ? कोणत्या विभागाला किती निधी. Winter Session 2025

Winter Session 2025

Winter Session 2025 supplementary

सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. तब्बल ७५ हजार 286 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. (winter Session 2025 supplementary ) या पुरवणी मागण्यांपैकी १५ हजार ६४८ कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत.

यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, रब्बी हंगाम अनुदान व पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनीची भरपाई दिली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी,  6 103हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठी साडे ३ हजार कोटी रुपयांची तरतूद या पुरवण्या मागण्यात करण्यात आलेली आहे.

पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी रुपये ची तरतूद करण्यात आलेली असून एसटी महामंडळासाठी २ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.

आयुष्मान भारत योजनेसाठी 3250 कोटी तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद सरकारनं यात केली आहे.

Download PDF here 👇🏻👇🏻

winter-session-2025-supplementary-pdf