Shetrasta Scheme – शेतकऱ्यांना शेत रस्ते ही अतिशय महत्वाची बाब; पाणंद मुक्त शिवार, समृद्धीची नवी वाट राज्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना

Shetrasta Scheme मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना
शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून राज्य शासनाने १४ डिसेंबर २०२५ रोजी राज्यात “मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
गावातून शेताकडे जाणारे ‘पाणंद’ रस्ते, शेत रस्ते त्यांची अवस्था पावसाळ्यात अत्यंत बिकट होते. चिखल, खड्डे आणि काटेरी झुडपांमुळे रस्ते नावालाच उरतात.
सध्या यांत्रिकीकरणाच्या काळात ट्रॅक्टर, हार्वेस्टरसारखी आधुनिक यंत्रे शेतापर्यंत पोहोचू शकत नाहीत, परिणामी शेतकऱ्यांना डोक्यावरून खते व बियाणे वाहून न्यावे लागतात, ज्यामुळे वेळ आणि श्रमाचा अपव्यय होतो.
शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीच राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ठळक वैशिष्टे
राज्यात पूर्वी राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मानवी मजुरांच्या वापरामुळे व निधीच्या कमतरतेमुळे कामांना विलंब होत असे. मात्र, ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ ही पूर्णपणे यंत्रसामग्रीवर आधारित (Mechanized) योजना आहे. यामध्ये जेसीबी, पोकलेन व रोड रोलरसारख्या अवजड यंत्रांचा वापर करून रस्ते जलद गतीने व दर्जेदार शेत रस्ते बनवले जातील.
शेतकऱ्यांची कामे अडकू नयेत म्हणून शासनाने या योजनेत प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण केले आहे.
प्रत्येक रस्त्याच्या निवडीचे आणि मंजुरीचे अधिकार आता स्थानिक पातळीवरच देण्यात आले आहेत. स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि सदस्य सचिव म्हणून उपविभागीय अधिकारी (SDO) हे निर्णय घेतील.
प्रशासकीय मान्यतेसाठी आता मंत्रालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल पाठवण्याची गरज उरलेली नाही, त्यामुळे वेळेची मोठी बचत होईल.
कामाचा वेग वाढवण्यासाठी २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे ‘क्लस्टर’ करून निविदा काढल्या जातील, ज्यामुळे सक्षम कंत्राटदार कामे करतील.
तांत्रिक निकष केवळ शेत रस्ते मोकळा करणे नव्हे, तर तो टिकवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
रस्त्याची वरची रुंदी (Top Width) किमान ५.५० मीटर असेल. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चर (Gutter) खोदणे अनिवार्य आहे, ज्यामुळे रस्ता सुरक्षित राहील.
शेत रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मातीचा ६० सें.मी. थर आणि त्यावर ३० सें.मी. (१ फूट) कठीण मुरुमाचा थर टाकून व्हायब्रेटर रोलरने त्याची दबाई केली जाईल.
पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक तिथे दर्जेदार सिमेंट पाईप्स (NP3 ग्रेड) वापरले जातील.
पाणंद रस्ते, शेत रस्ते मोकळे करण्यात सर्वात मोठा अडथळा अतिक्रमणाचा असतो. यावर शासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. तहसीलदार संबंधित शेतकऱ्याला ७ दिवसांची नोटीस देतील.
या कालावधीत अतिक्रमण न काढल्यास शासन स्वतः पोलीस बंदोबस्तात रस्ता मोकळा करेल. विशेष म्हणजे, मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. रस्ता तयार झाल्यावर त्याचे नुकसान केल्यास भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ( mukhyamantri baliraja pandan rasta yojana) या योजनेसाठी शासनाने स्वतंत्र लेखाशीर्ष उघडून निधीची तरतूद केली आहे. तसेच, १५ वा वित्त आयोग, जिल्हा वार्षिक योजना व सीएसआर (CSR) अशा विविध १४ योजनांमधील निधी या कामांसाठी एकत्रित (Convergence) वापरता येणार आहे. रस्ते बांधणीसाठी लागणारी माती, मुरूम यांवर कोणतीही रॉयल्टी (स्वामित्व धन) आकारली जाणार नाही
‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ ही केवळ एक रस्ते बांधणी योजना नसून, ती शेतकऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी चळवळ आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तहसील किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
mukhyamantri baliraja pandan rasta yojana मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना GR येथे पहा 👇🏻👇🏻 Shetrasta Scheme
मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती
mukhyamantri baliraja pandan rasta yojana Shetrasta Scheme
https://www.prabhudevalg.com/2022/03/matoshri-gram-samruddhi-shet-panand.html


