MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द

MahaDBT Yojana मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी शून्य टक्के निधी खर्च, शासनाचा मोठा निर्णय

MahaDBT Yojana

MahaDBT Yojana Shettale Update

राज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ( mukhyamantri shashwat krishi sinchan yojana ) राबवली जात आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 80% अनुदानावरती ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वैयक्तिक शेततळे अशा वेगवेगळ्या बाबींचा लाभ दिला जात आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना अंतर्गत शंभर कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीसह 2025 26 मध्ये वैयक्तिक शेततळे ही बाब राबवण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे.

मात्र यंदाच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी शून्य टक्के निधी खर्च झाला आहे याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी शेवटची मुदत याचबरोबर पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांचे काम पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे अन्यथा आता हे अर्ज आणि पूर्वसंमती बाद केली जाणार आहे.

सन 2025 26 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ( mukhyamantri shashwat krishi sinchan yojana ) राबवली जात असताना 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत 26972 लाभार्थ्यांचे निवड करून त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी किंवा त्यांचे पूर्व संमतीचे प्रक्रिया पुढे सुरू करण्यात आले होती.

मात्र राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती, पावसामुळे शेतकऱ्यांची काम न करता येणे या सर्वांच्या पार्श्वभूमी 19 जून 2025 रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचे अर्ज बाद न करणं कागदपत्र अपलोड केले असतील केले तर त्यांना पुढे मुदत देणं याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना पूर्वसंमते देण्यात आलेले आहेत त्यांच्या पूर्वसंमत्या रद्द न करण्यात याबाबत एक निर्देश देण्यात आलेले होते.

मात्र आता पावसाळा संपल्यानंतर सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड करण्यात आलेले नाहीत किंवा पूर्व संमती मिळालेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढील काम सुरू करण्यात आलेले नाहीत.

एकंदरीत आपण जर पाहिलं तर 26,972 लाभार्थ्यांना पात्र करण्यात आले होते आणि याच्यापैकी 21 कोटी 50 लाख रुपयांच्या पूर्व संमती देखील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

याच्यामध्ये आतापर्यंत तब्बल 13705 लाभार्थ्यांनी आपले कागदपत्र अपलोड केलेले नाहीत अशा प्रकारचे सध्याचे अंतर्गत परिस्थिती आहे.

आणि याच्यामुळे जे लाभार्थी नव्याने अर्ज करून या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत आणि अशाच लाभार्थ्यांना लाभ मिळावा याचबरोबर अशा प्रकारच्या काही जर ॲक्शन घेतल्या तर लाभार्थी याच्यामध्ये पुढील प्रक्रिया पार पाडतील म्हणून काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं पत्रक काढून या लाभार्थ्यांना पुढील सूचना दिल्या आहेत.

वैयक्तिक शेततळे ( Shettale ) खोदकामासाठी निवड झालेल्या व अद्यापही आवश्यक कागदपत्र अपलोड न केलेल्या सर्व शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपले कागदपत्र अपलोड करायचे आहेत.

कागदपत्र अपलोड न झाल्यास संबंधित शेतकऱ्याचा अर्ज रद्द होईल याची स्पष्टपणे जाणीव करून देण्यात येत आहे.

ज्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आलेले आहे अशा लाभार्थ्यांनी 30 दिवसांमध्ये कुठलेही समर्थनीय कारणाशिवाय खोदकाम पूर्ण केलेला नसेल अशा लाभार्थ्याच्या बाबतीत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी शहानिशा करून त्यांचे अर्ज बाद करावेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेले आहेत.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ( mukhyamantri shashwat krishi sinchan yojana ) अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी ( Shettale ) निवड झालेले जे लाभार्थी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्र अपलोड करणार नाही अशा सर्व लाभार्थ्याचे अर्ज 1 जानेवारी 2026 रोजी रद्द करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी असे निर्देश या पत्रातून देण्यात आलेले आहे.

मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेली योजना परंतु निधीचा बिलकुल वापर न झाल्यामुळे अखेर शासनाच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आलेले तीन ते चार टक्के निधी या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

आपली जर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे ( Shettale ) या बाबी साठी निवड झालेली असेल तर त्याच्या संदर्भातील पुढील काम चालू करा आणि काम चालू जर करणं शक्य नसेल तर तशाप्रकारे लेखी आपलं काम चालू करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबाबत आपल्या तालुका कृषी अधिकारी यांना कळवा जेणेकरून आपली पूर्वसंमती रद्द होणार नाही.