MahaDBT farmer scheme पोर्टल वर उन्हाळी हंगाम भुईमुंग बियाणे 100% अनुदानावर उपलब्ध, अर्ज करण्याचे आवाहन MahaDBT Seed Subsidy

MahaDBT Seed Subsidy 2025
राज्यात 30 जुलै 2025 च्या मंजुरीनुसार राष्ट्रीय खाद्यतेल अभियान NMEO योजना राबवली जात आहे.
याच योजनेअंतर्गत तेलबिया बाबी अंतर्गत भुईमूग या पिकासाठी अनुदानावर बियाणे दिले जाणार आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तेलबिया वर्गीय पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी, उन्हाळी हंगाम २०२५ करिता भुईमूग पिकासाठी हेक्टरी १५० किलो (दर ११४ रुपये प्रतिकिलो) शेंगा प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
केंद्र शासनाने भुईमूग या पिकासाठी निवड केलेल्या 8 जिल्ह्यांना १०० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे.
यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, धुळे, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर व कमाल १ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत हा लाभ देय आहे. बॅग आकार 20 kg व 30 kg असेल.
शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांच्या भुईमूगासाठीच्या बॅगांची पॅकिंग २० किंवा ३० किलोची आहे. त्याप्रमाणेच बियाण्यांचे वितरण करण्यात येईल.
क्षेत्रानुसार आवश्यक बियाण्यांच्या पॅकिंग साईजनुसार अधिकचे बियाणे परिगणित होत असल्यास, त्यासाठीची रक्कम शेतकऱ्यांना स्वहिस्स्याने भरावी लागणार आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड लक्षांकाच्या अधीन राहून ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
100% अनुदानावर भुईमुंग बियाणे अनुदान योजना लाभ घेण्यासाठी MahaDBT farmer scheme च्या पोर्टल वर अर्ज करावा लागेल.
Portal Link https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgrilLogin
संकेतस्थळावर ‘प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्सी घटक, औषधी आणि खते’ या बाबींतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भुईमूग #भुईमूगबियाणे #बियाणेअनुदान #शेतकरीयोजना #राष्ट्रीयखाद्यतेलअभियान #तेलबिया #महाडीबीटी #कृषीविभाग


