राज्यातील कांदा लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्वाची योजना कांदा चाळ योजना; पहा काय आहेत लाभ, अर्ज कसा करावा, कोण होणार पात्र Kanda Chal Yojana

Kanda Chal yojana 2026
राज्यात कांदा हे एक महत्वाचे पीक आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याच उत्पादन घेतलं जात. मात्र सर्वसाधारणपणे कांदा काढल्यानंतर साठवणूक करत असताना जमिनीवर पसरवून ठेवला जातो. काही ठिकाणी शेतकरी आपल्या पद्धतीने तयार केलेल्या चाळीत कांद्याची साठवणूक करतात, त्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणात सडतो.
अशा शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक जर करता आली तर आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात टळू शकते व कांद्याची गुणवत्ता ही टिकून राहू शकते, यासाठी कृषी विभागाकडून कांदा चाळ अनुदान योजना राबवली जाते.
कांदा चाळ अनुदान योजना लाभार्थी पात्रता निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी, या जमिनीवर ७/१२ ला कांदा या पिकाची ई पीक पाहणी केलेली असावी. कांदा पिक पेरा असावा
या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, महिला शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी सहकारी संस्था, पणन महासंघ या लाभार्थ्यांना दिला जातो.
कांदा चाळ अनुदान योजना अनुदान मर्यादा
या योजनेअंतर्गत अनुदान देत असताना ५ ते २५ मे टन, २५ ते ५०० मे टन, ५०० ते १००० मे टन अशा तीन प्रकारात अनुदानाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
यातील पहिला प्रकार ५ ते २५ मेट्रिक टन यात खर्चाचा मापदंड १०,००० रुपये प्रति मेट्रिक टन इतका ग्राह्य धरून याच्या ५०% जास्तीत जास्त ₹५००० प्रति मेट्रिक टन इतके अनुदान दिले जाते. २५ हजार ते १.२५ लाख
२५ ते ५०० मेट्रिक टनसाठी खर्चाचा मापदंड ८,००० रुपये प्रति मेट्रिक टन इतका ग्राह्य धरून याच्या ५०% जास्तीत जास्त ₹४००० प्रति मेट्रिक टन इतके अनुदान दिले जाते. १ लाख ते २० लाख
तर ५०० ते १००० मेट्रिक टनसाठी खर्चाचा मापदंड ६,००० रुपये प्रति मेट्रिक टन इतका ग्राह्य धरून याच्या ५०% जास्तीत जास्त ₹३००० प्रति मेट्रिक टन इतके अनुदान दिले जाते. २० लाख ते ३० लाख
Kanda Chal yojana 2026 तांत्रिक निकष
कांदा चाळीचे बांधकाम करताना कांदा साठवणुकीची जागा जमिनीपासून किमान ६० सेमी उंच असावी.
कांदा चाळीचे बांधकाम करत असताना कांदा चाळीची लांब बाजू ही दक्षिण उत्तर अशी असावी तर जास्त पावसाच्या ठिकाणी ही बाजू पूर्व पश्चिम असावी.
Kanda Chal yojana 2026 आवश्यक कागदपत्र
शेतकऱ्याची शेत जमिनीच्या मालकीची कागदपत्र ७/१२, ८ अ उतारा.
अर्जदाराचे आधार कार्ड
शेतकरी विशिष्ट जात प्रकारातून अर्ज करत असेल तर जातीचे प्रमाणपत्र.
कांदा चाळ हमीपत्र , बंधपत्र नमुने खालील लिंक वर मिळतील.
हमीपत्र बंधपत्र NAMUNA
Kanda Chal yojana 2026 अर्ज कसा करावा
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी Mahadbt Farmer Scheme च्या पोर्टल वरती लॉगिन करून अर्ज करावा लागेल, अर्ज कसा करावा खालील व्हिडिओ मध्ये पाहा.


