Crop Loan राज्यात अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पिक कर्ज वसुलीसह पिक कर्जाच्या पुनर्गठन बाबत मोठा निर्णय.

Crop Loan Restructuring GR
राज्यातील २८२ तालुक्यांना अंशतः बाधित आणि पूर्ण बाधित अशी वर्गवारी करून अनेक सवलती प्रदान करण्यात आलेल्या आहेत.
ज्यामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफी, वीज बिलात सवलत, शेतसारा माफी अशा अनेक सवलती या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक १०.१०.२०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतक-यांना सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती या सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
आणि याच अनुषंगाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सहकार विभागाने एक शासन निर्णय घेऊन काही निर्णय घेतले आहेत.
२६ नोव्हेंबर च्या Govt GR नुसार बाधित तालुक्याच्या सर्व गावातील बाधीत शेतक-यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगीती ( Crop Loan ) बाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC), महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
GR येथे पहा 👇🏻👇🏻


