खरीप हंगाम 2025 ची अंतिम पैसेवारी जाहीर होण्यास सुरुवात, या जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशाखाली Antim Paisewari 2025

Antim Paisewari 2025
खरीप हंगाम 2025 मध्ये झालेले नुकसान, नुकसान होऊन न मिळालेली अतिवृष्टी नुकसान भरपाई, न मिळालेला पिक विमा किंवा पिक विमा मिळणार की नाही मिळणार हा पडलेला प्रश्न.
आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बाब म्हणजे खरिप पिकांची पैसेवारी.
तसेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजेच साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांची पैसेवारी जाहीर केली जाईल.
यामध्ये परभणी, हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांची पैसेवारी ही 50 पैसे पेक्षा खाली आलेली आहे कारण नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यामध्ये हे दोन देखील महत्त्वाचे असे जिल्हे आहेत.
Parbhani Antim Paisewari 2025
परभणी १२८ ३५.००, जिंतूर १६९ ४१.३३, सेलू ९५ ४६.३३, मानवत ५४ ४५.२०, पाथरी ५६ ३४.००, सोनपेठ ५२ ४०.४६, गंगाखेड १०५ ४२.००, पालम ८२ ४२.००, पूर्णा ९४ ४४.७८ अशी आहे.
Hingoli Antim Paisewari 2025
हिंगोली १५२ ४४.०६,, कळमनुरी १४८ ३९.८७, वसमत १५१ ४८.००, औंढा नागनाथ १२२ ४५.००, सेनगाव १३३ ४५.४७
Nanded Antim Paisevari 2025
नांदेड ३२ (८८), अर्धापूर ३७ (६६), कंधार ३२ (१२६), लोहा ३२ (१२६), भोकर ३२.३६ (७९), मुदखेड ३२.३३ (५५), हदगाव ३४ (१३७, हिमायतनगर ३७ (६४), किनवट ३७ (१९१), माहूर ३७(८४), देगलूर ३६ (१०८), मुखेड ३२ (१३५), बिलोली ३५ (९२), नायगाव ३२ (८९), धर्माबाद ३१ (५६), उमरी ३५ (६३)
Amaravati kharif Antim Paisewari
तिवसा तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी ४३ पैसे,
धारणी, चिखलदरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांची पैसेवारी ४९ पैसे,
वरुड, दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात ४८ पैसे,
भातकुली, चांदूर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यांची पैसेवारी ४७ पैसे,
अमरावती आणि अचलपूर तालुक्याची पैसेवारी ४६ पैसे
Sangali Antim Anewari
जत तहसील ४६, तर संख अप्पर तहसीलकडील ८ अशा ५४ गावांची पैसेवारी ५० पैशांहून कमी आलेली आहे.
Chatrapati Sambhajinagar antim Paisewari
छत्रपती संभाजीनगर ४६.७, पैठण ४६.११, फुलंब्री ४९, वैजापूर ४७.७३, गंगापूर ४८.१५, खुलताबाद ४८, सिल्लोड ४८ , कन्नड ४८, सोयगाव ४८, एकूण जिल्हा ४७.८१
Jalna Paisevari 2025
जालना जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील खरीप पिकांच्या पैसेवारीमध्ये खरीप गावे एकूण 667 व रब्बी गावे 298 अशा एकूण 965 गावांची खरीप अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे
जालना जिल्ह्यातील 971 गावांपैकी 667 खरीप गावे व 298 रब्बी गावे असे एकुण 965 गावांची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
मंठा तालुक्यातील चांदेश्वर व गोपेगाव हे गाव पुर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे तसेच गारटेकी, सोनुनकरवाडी व किर्तापूर तांडा या गावांना महसूल दर्जा प्राप्त नसल्यामुळे मंठा तालुक्यातील 5 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही.
जालना जिल्ह्यातील पैसेवारी जाहीर केलेल्या एकुण 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे. खरीप पिकांची हंगामी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
जालना तालुका – 151 गावे, बदनापूर-92, भोकरदन-156, जाफ्राबाद-101, परतूर-98, मंठा-117, अंबड-138, घनसावंगी-118 आदि गावांचा समावेश आहे.
खरीप हंगाम २०२५–२६ साठी बुलढाणा जिल्ह्यातील १४२० गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी नोंदविण्यात आली असून, ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेले एकही गाव नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्याची सरासरी पैसेवारी : ४७ टक्के – चिखली, जळगाव जामोद व शेगाव – ४९ पैसे, लोणार व सिंदखेड राजा – ४५ पैसे, उर्वरित तालुके – ४६ ते ४८ पैसे. तालुकानिहाय सर्व १४२० गावांमध्ये पैसेवारी ५० पैशांखाली नोंदविण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात एकूण 1 हजार 12 गावांपैकी 990 गावांची पैसेवारी काढण्यात आली आहे. या गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी (48 पैसे) अशी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबत पत्र जारी केले. सर्व ग्रामपंचायत कार्यालय स्तरावर, चावडीवर, तसेच दवंडीद्वारे प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील ११० महसूल मंडळांमधील पीक कापणी प्रयोगांच्या आधारे अंतिम पैसेवारी ठरविण्यात आली आहे. यामध्ये झरी जामणी तालुक्यातील झरी, मुकुटबन आणि माथार्जुन सारख्या मंडळांनी ४९ पैसे इतकी पैसेवारी नोंदवली आहे, तर यवतमाळ तालुक्यातील सावरगड आणि कोळंबीसारख्या मंडळांची पैसेवारी ४६ पैशांपर्यंत खाली आली आहे.
बाभूळगाव, आर्णी, दारव्हा, दिग्रस, मारेगाव आणि झरी जामणी या तालुक्यांची पैसेवारी सर्वांत कमी, म्हणजे ४६ पैसे इतकी नोंदवण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यात १ जानेवारी रोजी सन २०२५-२६ या वर्षातील ७९३ गावांची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी सरासरी ४७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी हंगामी पैसेवारी मंगरूळपीर तालुक्याची ४५ अशी आहे. वाशिम, रिसोड व कारंजा या तीन तालुक्यांतील ३९८ गावांची हंगामी पैसेवारी सरासरी ४७ आहे. तर मानोरा ४८ व कारंजा तालुका ४९ पैसे आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्याची पैसेवारी ७८ पैसे, गोरेगाव तालुका ९५ पैसे, तिरोडा ६३ पैसे, अर्जुनी मोर ८७ पैसे, देवरी तालुका ८५ पैसे, आमगाव तालुका ७४ पैसे, सालेकसा तालुका ८९ पैसे व सडक अर्जुनी तालुक्याची अंतिम पैसेवारी ८१ पैसे आली आहे.
वर्धा जिल्हा आर्वी २०८ ४७, आष्टी १३६ ४८, कारजा १२० ४८, हिंगणघाट १८८ ४६, समुद्रपूर २१९ ४७, वर्धा १५४. ४५ पैसे, सेलू. १६६. ४७ पैसे, देवळी १४८. ४६ पैसे
Dharashiv Antim Paisewari
धाराशिव ४३.००
तुळजापूर ४४.००
उमरगा ४७.६६
लोहारा ४८.००
भूम ४७.००
परंडा ४७.००
कळंब ४६.००
वाशी ४६.००
चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामाची 1788 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी 0.54 पैसे आहे.
तालुकानिहाय आकडेवारी : चंद्रपूर तालुका (एकूण गावे – 101, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 86, तालुका पैसेवारी – 0.53), बल्लारपूर तालुका (एकूण गावे – 35, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 32, तालुका पैसेवारी – 0.45), राजुरा तालुका (एकूण गावे – 111, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 110, तालुका पैसेवारी – 0.48), कोरपना तालुका (एकूण गावे – 113, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 113, तालुका पैसेवारी – 0.47), जीवती तालुका (एकूण गावे – 83, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 75, तालुका पैसेवारी – 0.58),
गोंडपिपरी तालुका (एकूण गावे – 98, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 98, तालुका पैसेवारी – 0.47), पोंभुर्णा तालुका (एकूण गावे – 71, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 71, तालुका पैसेवारी – 0.54), मूल तालुका (एकूण गावे – 113, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 111, तालुका पैसेवारी – 0.58), सावली तालुका (एकूण गावे – 111, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 111, तालुका पैसेवारी – 0.69), सिंदेवाही तालुका (एकूण गावे – 115, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 113, तालुका पैसेवारी – 0.56),
चंद्रपूर नागभीड (एकूण गावे – 138, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 138, तालुका पैसेवारी – 0.65), ब्रम्हपुरी तालुका (एकूण गावे – 140, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 138, तालुका पैसेवारी – 0.62), चिमूर तालुका (एकूण गावे – 259, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 258, तालुका पैसेवारी – 0.47), वरोरा तालुका (एकूण गावे – 186, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 185, तालुका पैसेवारी – 0.47) आणि भद्रावती तालुका (एकूण गावे – 162, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 149, तालुका पैसेवारी – 0.48).
याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्याचीही जसे की लातूर धाराशिव या जिल्ह्यांची देखील Antim Paisewari पैसेवारी 50 पैसे कमी आलेली आहे. त्याच्याबद्दल अधिकृत माहिती समोर आल्यानंतर त्याच्याबद्दल देखील माहिती घेऊयात.
नाशिक, अमरावती, नागपूर विभाग देखील लवकरच अर्थात एक दोन दिवसांमध्ये आकडेवारी समोर येईल.
आणि ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील त्या त्या जिल्ह्यांच्या अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करनार आहोत.
शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी या अंतिम पैसेवारी Antim Paisewari चा आधार मिळू शकतो कारण खरिपाची अंतिम पैसेवारी ही देखील पिक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे, झालेल्या उत्पादनांच्या आधारे काढली जाते.
यावर्षी राबवली जाणारी सुधारित पीकविमा योजना मध्ये जो पिकविमा काढला जाणार आहे तो देखील पिक कापणी प्रयोगाचा आधारे काढला जाणार आहे.
त्यामुळे अंतिम पैसेवारी ही पिक विमा मिळण्यासाठी सुद्धा याची मोठी मदत मिळणार आहे.


