Farmer ID GR शासनाचा मोठा निर्णय, या शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी

Farmer ID GR

AgriStack योजनेअंतर्गत विविध तांत्रिक कारणास्तव फार्मर आयडी न मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, शासनाचा नवा Farmer ID GR

Farmer ID GR

Farmer ID GR 06 Nov 2026

राज्यात ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी मिळवताना जमीनधारणा अथवा प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्राची माहिती उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अद्याप या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनले नसल्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.

अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यासंदर्भात शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून निर्णय घेण्यात आलेला आहे.

आता या शेतकऱ्यांना पात्र शेतकरी जमीनधारणा व प्रत्यक्ष शेती करणाऱ्या संबंधित व्यक्तीची माहिती आणि शेती क्षेत्राचे पडताळणी या आधारे फार्मरआयडी साठी नोंदणी करता येणार आहे आणि यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून नवीन मार्गदर्शक सूचना या जीआर च्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहेत.

या संदर्भातील शासन निर्णय आपण खालील लिंक वरती पाहू शकता.

Farme ID Gr Link PDF ग्रिस्टॅकच्या वापरादरम्यान उद्भवणाऱ्या अपवादात्मक प्रकरणांबाबत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने मार्गदर्शक कार्यपद्धती (SOP) निश्चित करणेबाबत

महसूल विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार 1 जानेवारी 2015 पूर्वीपासून शेती कसं असलेले आणि आजही संबंधित जमीन ताब्यात असलेले शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती करत असल्याचा एक पुरावा सादर केल्यानंतर फार्मरआयडी काढता येणार आहे.

प्रत्यक्ष शेती करत असल्याचा पुरावा असणारे शेतकरी अधिकृत भाडेपट्टा किंवा कराराने शेती करणारे शेतकरी तसेच शासनाकडून जमीन मंजूर अथवा वाटप झालेले शेतकरी यांना या मार्गदर्शक सूचनानुसार फार्मर आयडी बनवून दिले जाणार आहेत.

या मार्गदर्शक सूचनानुसार फार्मर आयडी देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार अशा तीन स्तरावर ती पडताळणी आणि मान्यतेची प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्याकडून संबंधित गावातील उपलब्ध जुने आणि अध्यावती महसूल अभिलेख जमीन महसूल भरल्याच्या पावत्या इनाम नोंदवही सनद भाडेपट्टा करार जमीन मंजुरी आदेश तसेच इतर कागदपत्राची तपासणी केली जाईल आणि क्षेत्र निश्चित केलं जाईल.

यानंतर तपासणीसाठी आधारभूत ठरलेल्या कागदपत्राच्या प्रती प्रणाली वरती अपलोड केल्या जातील तसेच शेतकऱ्यांची यादी गावाच्या चावडीवरती प्रसिद्ध केली जाईल.

पुढील टप्प्यामध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्याने नोंदवलेली माहिती आणि शेत्र निश्चितीसाठी वापरलेले आधार आणि अपलोड केलेले कागदपत्र हे मंडळ अधिकारी पडताळणी करतील माहिती योग्य असल्यास अहवाल पुढे तहसीलदार कार्यालयाला पाठवला जाईल.

तहसीलदार उपलब्ध कागदपत्र अभिलेख आणि मंडळ अधिकाऱ्याने केलेली पडताळणी तपासून प्रकरणाची सत्यता आणि वैधता निश्चित करतील आणि त्या प्रकरणास मंजुरी देतील.

तहसीलदारांकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रणालीमध्ये नोंदवलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संबंधित शेत जमिनीला स्वतंत्र फार्मरआयडी प्रदान करण्यात येईल ही माहिती पुढील कारवाईसाठी केंद्रीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणे कडे उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नागरी सुविधा केंद्रमार्फत अन्य शेतकऱ्याप्रमाणे फार्मरआयडी काढता येणार आहे.