खरीप हंगाम २०२५ च्या पिकविम्याचे कॅल्क्युलेशन सुरू झाले आहे पाहुयात ऑनलाईन पद्धतीने आपला पीकविमा मंजूर आहे का ते कसं तपासायचं PikVima Status

पीक विमा 2025 PikVima Status
शेतकरी खरीप पीकविमा २०२५ च्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत, पिक विमा कंपनी कडून पीकविमा वितरणात खूप विलंब केला आहे. अखेर शेतकऱ्यांचे पीकविमा पॉलिसी समोर पीकविमा मंजुरीची स्थिती दाखवायला सुरू झाले आहे.
हे ऑनलाईन पाहण्यासाठी आपल्याला PMFBY अर्थात प्रधानमंत्री पीक विमा योजना च्या पोर्टल जायचं आहे.
PMFBY Portal Link https://pmfby.gov.in/ceo/dashboard

https://pmfby.gov.in/ceo/dashboard या संकेतस्थळावर आपण विविध ऑप्शन पाहू शकतो याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे फार्मर कॉर्नरची ( PMFBY Farmer Corner ). याच्यामधून आपण फार्मर लॉगिन करू शकतो. यासाठी आपल्या फार्मर कॉर्नर वरती क्लिक करायचे आहे.
फार्मर कॉर्नर वर केल्यानंतर आपल्याला लॉगिन ऑप्शन दाखवले जाते यामध्ये लॉगिन फॉर फार्मर वरती क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो पॉलिसी सोबत लिंक असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली दिलेला संकेतांक टाकायचा आहे.
यानंतर मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो आलेला ओटीपी खाली otp टाकण्यासाठी दिलेल्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि लॉगिन वरती क्लिक करायचे आहे. आपलं लॉगिन होईल. लॉगिन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला शेतकऱ्याचे नाव दाखवलं जाईल, पॉलिसी नंबर दाखवली जाईल याच्यामध्ये आपण खरीप 2025 ची पोलिसी आपल्याला निवडावयाची आहे.
खरीप पीकविमा 2025 पोलिसी निवडल्यानंतर त्या पॉलिसी चा नंबर आणि त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाते. त्याला राइट साईडला स्क्रोल करून पॉलिसी चा नंबर आणि त्याच्याबद्दलची ही माहिती पाहू शकता.
याच्यामध्ये एक ऑप्शन दाखवले जाते व्ह्यू , या VIEW ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचे आहे. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज खुलेल ज्यामध्ये त्या पॉलिसीच्या संदर्भातील माहिती दाखवली जात आहे.
आता याच्यामध्ये आपण पाहू शकता कॅल्क्युलेशनची काही स्थिती आहे ती दाखवली जाते रक्कम झिरो झिरो दाखवली जात आहे ती पॉलिसी पण या ठिकाणी पाहू शकता कॅल्क्युलेशन झालेले त्याच्यामध्ये प्लस पर्सेंटेज किती दाखवलेला आहे ही माहिती पाहू शकता.
अशाप्रकारे आपण आपल्या पीकविमा पॉलिसी ची स्थिती ऑनलाईन पाहू शकता.
Yield base Data 2025 watch here


