Bandhkam kamgar yojana शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज केला असेल तर करा हे काम

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळाकडे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केला असेल तर महत्वाचे अपडेट Bandhkam kamgar yojana

Bandhkam kamgar yojana

Bandhkam kamgar yojana Scholership 2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत करण्यात आली असून मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी करून नोंदीत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एकूण ०७ योजना राबविण्यात येतात.

याचप्रमाणे शासनाच्या विविध विभागांमार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात.

राज्यात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिसूचनेनुसार जर लाभार्थ्यास, केंद्र सरकारकडून किंवा राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळत असेल तर, लाभाची व्दिरुक्ती टाळण्यासाठी, मंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उक्त लाभार्थी पात्र असणार नाही.

या कारणास्तव नोंदीत सक्रीय (जिवीत) बांधकाम कामगारांचे शैक्षणिक अर्थसहाय्याचे अर्ज तपासणी करतांना उपरोक्त नमूद केंद्र/राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसून केवळ मंडळाअंतर्गत शिष्यवृत्ती मिळणेकरीता अर्ज सादर केलेला आहे या आशयाचे स्वीघोषणापत्र घेतले जाणार आहे.

खालील दिलेल घोषणापत्र जोडल्यानंतर जोडलेल्या स्वयंघोषणापत्राची पाहणी करून अर्ज मंजूर करण्यात येणार आहे.

यामुळे दुबार लाभ घेतल्याचे स्वयंघोषणापत्र मंडळाच्या एकात्मीक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली (IWBMS) वर अपलोड करण्याच्या सूचना अर्ज केलेल्या बांधकाम कामगारांना देण्यात आलेल्या आहेत.