CMYKPY मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

CMYKPY मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा

CMYKPY

CMYKPY Scheme 2026 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

राज्यात कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील बेरोजगार तसेच, नवशिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना GR PDF

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407091701223903.pdf

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना योजना महाराष्ट्र शासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत आस्थापनांमध्ये रुजू होणाऱ्या १२ वी पास प्रशिक्षणार्थीना ६ हजार, आयटीआय व पदविका प्रशिक्षणार्थीना ८ हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन ११ महिन्यापर्यंत दिले जाते.

तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील बेरोजगार उमेदवारासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये विविध प्रकारच्या कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या CMYKPY वेबपोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील अधिवास असणारे विद्यार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CMYKPY या योजनेत लाभासाठी उमेदवारांची वयोमर्यादा किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावी. किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास आयटीआय,पदविका, पदवी, पदव्युत्तर (शिक्षण चालू असलेले उमेदवार, NAPS, MAPS उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत)

इच्छुक उमेदवारांनी आपले आधार नोंदणी असणारे बँक खाते व आधार संलग्न मोबाईल क्रमांक यासह विभागाच्या CMYKPY या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.

या ऑनलाईन पोर्टल वर आपली प्रोफाईल अद्यावत करुन या विभागाच्या वेब पोर्टलवर शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना पतसंस्था,बँका शैक्षणिक संस्था इ. यांनी कार्य प्रशिक्षणासाठी जिल्हानिहाय ऑनलाईन रिक्त पदांची मागणी केली आहे.

या जिल्हानिहाय रिक्तपदां साठी application करुन या योजनेचा लाभा घ्यावा. राज्यातील जास्तीत जास्त खाजगी तसेच २० पेक्षा जास्त मंजूर पदे असलेल्या शासकीय आस्थापनांनी आपल्याकडील प्रशिक्षणार्थीसाठीची रिक्तपदे शासन निर्णयानुसार पोर्टलवर अधिसूचित करण्यासाठी या कार्यालयाशी संपर्क करावा.