Epeek Pahani 2025 ऑफलाईन ई पीक पाहणी शासनाचा मोठा निर्णय

Epeek Pahani खरीप हंगाम 2025 मध्ये काही कारणास्तव ई पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय; ऑफलाईन नोंदी घेणार.

Epeek Pahani

EPeek Pahani 2025 New GR

खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांना Epeek Pahani साठी देण्यात आलेल्या मुदतीत ई- पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतक-यांच्या पिकांची ऑफलाईन ई पीक पाहणी करण्याचा शासनाचा निर्णय.

ही ई पीक पाहणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.

आपली ई पीक पाहणी न झालेल्या शेतकरी बांधवांनी ऑफलाईन पाहणीसाठीचे अर्ज 24 डिसेंबरपूर्वी ग्राम महसूल अधिका-यांकडे जमा करावयाचे आहेत.

या बाबतचा शासन निर्णय 14 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आला आहे.

शासन निर्णय येथे पहा 👇🏻👇🏻

ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पीकांची नोंद करणेबाबत.

या GR नुसार जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून सर्व जिल्ह्यांना या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

या ऑफलाईन पाहणीसाठी ग्रामस्तरीय समिती मंडळ अधिका-यांच्या अध्यक्षतेत स्थापण्यात येणार असून, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी हे सदस्य असणार आहेत.

ज्या शेतक-यांना काही कारणांस्तव आपली खरीप हंगाम 2025 ची ई पीक पाहणी द्वारे पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतक-यांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे दि. 17 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत पिकांची नोंद करण्याबाबत अर्ज सादर करायचा आहे.

प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीने संयुक्तपणे संबंधित शेतक-याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी 25 डिसेंबर ते 7 जानेवारीदरम्यान केली जाणार आहे.

पिक पाहणीची वेळ निश्चित करून पूर्वकल्पना संबंधित शेतकरी व शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान 4-5 शेतक-यांना लेखी माहिती दिली जाईल.

पाहणीत स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीसाठी वस्तुस्थितीदर्शक पंचनामा करावा व शेताच्या बांधाला लागून असलेले इतर शेतक-यांचे जबाब नोंदवले जातील.

लागवडीसाठी खरेदी केलेले बियाणे, खते आदींच्या खरेदी पावत्या तपासून नोंद घ्यावी. गतवर्षीच्या पीक पाहणीची नोंद नमूद केली जाईल.

चौकशीअंती पिकाचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात लिहून हे सर्व अहवाल मंडळ अधिका-यांनी एसडीओ यांच्या अध्यक्षतेतील समितीला गावनिहाय एकत्रपणे दि. 12 जानेवारीपूर्वी सादर केले जाईल.

यामध्ये खाते क्रमांक, नाव, गट क्र., एकूण क्षेत्र, पिकांची नावे, क्षेत्र आदी बाबी नमूद केल्या जातील. 

त्यानंतर एसडीओंनी सर्व बाबी तपासून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा. जिल्हाधिका-यांकडून अहवाल शासनाला देण्यात येईल.

ऑफलाईन पाहणीचे वेळापत्रक Offline E Peek Pahani

शेतक-यांनी ग्राम महसूल अधिका-यांकडे अर्ज करणे – 17 ते 24 डिसेंबर.

ग्रामस्तरीय समितीने करावयाची स्थळपाहणी- 25 डिसेंबर ते 7 जानेवारी.

उपविभागीय समितीकडे अहवाल देणे- 8 ते 12 जानेवारी.

जिल्हाधिका-यांकडे अहवाल देणे- 13 ते 15 जानेवारी.