Crop Loan अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

Crop Loan राज्यात अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पिक कर्ज वसुलीसह पिक कर्जाच्या पुनर्गठन बाबत मोठा निर्णय.

Crop Loan

Crop Loan Restructuring GR

राज्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून एक विशेष मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे.

राज्यातील २८२ तालुक्यांना अंशतः बाधित आणि पूर्ण बाधित अशी वर्गवारी करून अनेक सवलती प्रदान करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिक / शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी, मनुष्यहानी होणे, घरांची पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरीत करणे या करीता आपदग्रस्तांना दृष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक १०.१०.२०२५ रोजीच्या Govt GR नुसार मान्यता दिली आहे.

ज्यामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफी, वीज बिलात सवलत, शेतसारा माफी अशा अनेक सवलती या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक १०.१०.२०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतक-यांना सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती या सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

आणि याच अनुषंगाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सहकार विभागाने एक शासन निर्णय घेऊन काही निर्णय घेतले आहेत.

२६ नोव्हेंबर च्या Govt GR नुसार बाधित तालुक्याच्या सर्व गावातील बाधीत शेतक-यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगीती ( Crop Loan ) बाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC), महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

GR येथे पहा 👇🏻👇🏻

सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत..

GR PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *