Ativrushti bharpai 2025 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पॅकेज जाहीर

राज्यात अतिवृष्टी पूर परिस्थिती मुळे बाधित झालेल्या 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज जाहीर, पहा कसा मिळणार दिलासा? काय असेल मदत? Ativrushti bharpai 2025

Ativrushti bharpai 2025

Ativrushti Bharpai 2025

GR PDF 04.11.2025

राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत

GR PDF 04.11.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202511041624104619.pdf

राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत

GR PDG 04.11.2025

राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत

GR PDF 04.11.2025

राज्यात कोल्हापूर जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत

GR PDF 30.10.2025

राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.

GR PDF 30.10.2025

राज्यात यवतमाळ, वाशिम व सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.

GR PDF 30.10.2025

राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत

GR PDF 30.10.2025

राज्यात अमरावती जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत…

GR PDF 29.10.2025

राज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना व वर्धा जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.

GR PDF 29.10.2025

राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्यव्यवसायाच्या नुकसानीबाबत बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief package) व सवलती देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना /कार्यपध्दती निश्चित करणेबाबत.

GR PDF 18.10.2025

राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत

GR PDF 17.10.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510171644351319.pdf

GR PDF 17.10.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510171639459419.pdf

GR PDF 16.10.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510162018208219.pdf

GR PDF 16.10.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510091904513519.pdf

New GR 15.10.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510151318383219.pdf

New GR 13.10.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510131733411719.pdf

New GR 10.10.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510102358219219.pdf

New GR 10.10.2025

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510102357501519.pdf

राज्यातील २९ जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थिती मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदतीचं पॅकेज जाहीर केले आहे.

या हंगामात राज्यातील एकूण 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 महसूल मंडळ प्रभावित झालेली आहेत. या नुकसान ग्रस्त मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट ३ हेक्टर मर्यादेत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

शासनाच्या या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे.

जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न असणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

पुरामुळे नुकसानग्रस्तांना कपडे भांडी नुकसानी साठी तातडीची 10 हजार रुपयांची मदत, गहू, तांदूळ आदी देण्यात आले आहे. यासाठी पहिला हप्ता ₹२२१५ कोटी तातडीने मंजूर करण्यात आला आहे.

खरीप हंगाम २०२५ मध्ये राज्यात एक कोटी 43 लाख 52 हजार 281 हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड झाली. त्यापैकी 68 लाख 67 हजार 756 हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले, तिथे नव्याने घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मदत करण्यात येणार आहे, तर डोंगरी भागात घरे बांधण्यासाठी अतिरिक्त 10 हजारांची मदत देण्यात येणार आहे.

पुरामुळे, पाणी शिरल्यामुळे ज्या दुकानांचे नुकसान झाले असेल त्यांना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांसाठी तीन जनावरांची अट रद्द करून प्रति दुधाळ जनावर 37 हजार 500 रुपये, ओडकाम करणारी जनावर ३२०००, तर 100 रुपये प्रति कोंबडी अशी भरपाई देण्यात येणार आहे.

जमीन खरडून गेलेली शेती पुन्हा लागवडीयोग्य होण्यासाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टरी थेट मदत तर तीन लाख रुपये मनरेगा मधून दिले जातील.

बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून प्रति विहीर 30 हजार रुपये देण्यात येतील. त्याचप्रमाणे मत्स्यशेती तसेच बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मदत देताना ॲग्रीस्टॅक ( Agristack farmer id ) मधील माहिती ग्राह्य धरली जाईल. त्यासाठी कुठलीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.

अस असेल Ativrushti Bharpai 2025 पॅकेज

मृतांच्या कुटुंबीयांना: 4 लाख प्रत्येकी, जखमी व्यक्तींना : 74 हजार रुपये ते 2.5 लाख रुपये,

घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान: पाच हजार रुपये प्रति कुटुंब, कपडे, वस्तूंचे नुकसान: पाच हजार रुपये प्रतिकुटुंब, दुकानदार, टपरीधारक: 50 हजार रुपये,

डोंगरी भागात पडझड, नष्ट पक्क्या घरांना : एक लाख 20 हजार रुपये, डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना : ए‍‍क लाख 30 हजार रुपये, अंशतः पडझड: 6,500 रुपये, झोपड्या: आठ हजार रुपये,

जनावरांचे गोठे: तीन हजार रुपये, दुधाळ जनावरे: 37,500 रुपये, ओढकाम करणारी जनावरे: 32 हजार रुपये, कुक्कुटपालन: 100 रुपये प्रति कोंबडी.

खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टर थेट मदत आणि मनरेगाअंतर्गत तीन लाख रुपये प्रतिहेक्टर, खचलेली किंवा बाधित विहीर: 30 हजार रुपये प्रति विहीर, तातडीच्या मदतीसाठी 1500 कोटी रुपये जिल्हा नियोजन निधीमध्ये राखीव.

NDRF निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी 10 हजार कोटी रुपये अतिरिक्त.

दुष्काळी सवलती लागू

जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन ( farmer crop loan restructhuring ), शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा, महाविद्यालय परीक्षा शुल्कात माफी, रोहयो ( MGNREGA works ) कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

Kharip pik vima 2025

विमाधारक शेतकऱ्यांना Pikvima लवकर मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान स्वत: प्रयत्न करीत असून विमाधारक ( crop insurance) शेतकऱ्यांनाही 17 हजार रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम दिली जाणार आहे. या भरपाईसाठी 18 हजार कोटींहून अधिकची तरतूद केली जाणार.

अतिवृष्टी व पुर मुळे पूर्णतः बाधित तालुके- Ativrushti bharpai 2025

पालघर :- पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड (चार तालुके)

नाशिक– मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला ( 12 तालुके)

जळगांव– एरंडोल, पारोळा, धरणगाव,  पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर (13 तालुके)

अहिल्यानगर– अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव ( 11 तालुके)

सोलापूर– उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला ( 11 तालुके)

सांगली– मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, विटा, आटपाडी, जत ( नऊ तालुके)

सातारा- कोरेगाव, खटाव, माण ( तीन तालुके)

कोल्हापूर– करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड ( पाच तालुके)

छत्रपती संभाजीनगर– छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री (नऊ तालुके)

जालना– बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद ( आठ तालुके)

बीड– बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी ( 11 तालुके)

लातूर – लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरुरअनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर ( 10 तालुके)

धाराशिव– धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा ( आठ तालुके)

नांदेड– कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी ( 16 तालुके)

परभणी– पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी ( नऊ तालुके)

हिंगोली– हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत ( पाच तालुके)

बुलढाणा– चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद ( 11 तालुके)

अमरावती– अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, दर्यापूर ( 14 तालुके)

अकोला– अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शी टाकळी ( सात तालुके)

वाशिम– वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा ( सहा तालुके)

यवतमाळ– पुसद, यवतमाळ, बाभूळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी जामणी ( 16 तालुके)

वर्धा– वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा, आष्टी ( आठ तालुके)

नागपूर– नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड ( १३ तालुके)

भंडारा– साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखंदूर ( सात तालुके)

गोंदिया– देवरी ( एक तालुका)

चंद्रपूर- चंद्रपूर, भद्रावती, राजूरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रम्हपुरी ( 14 तालुके)

गडचिरोली– गडचिरोली, धानोरा, मूलचेरा, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापली, देसाईगंज (वडसा) (10 तालुके)

अतिवृष्टी व पुर मुळे अंशतः बाधित तालुके- Ativrushti bharpai 2025

नाशिक –  कळवण, देवळा,  इगतपुरी (तीन तालुके)

धुळे – धुळे, साक्री, शिंदखेडा (तीन तालुके)

अहिल्यानगर – पारनेर, संगमनेर, अकोले (तीन तालुके)

पुणे – हवेली, इंदापूर (दोन तालुके)

सांगली – कडेगांव (एक तालुका)

सातारा – सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी (पाच तालुके)

कोल्हापूर – कागल, शिरोळ, पन्हाळा (तीन तालुके)

बुलढाणा – नांदुरा, संग्रामपूर (दोन तालुके)

गोंदिया – तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव (सात तालुके)

गडचिरोली –  चारमोशी, कोरची (दोन तालुके)

अतिवृष्टी व पुर मुळे अंशतः बाधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र असतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *