Varg 2 Jamin GR भोगवठादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यास मंजुरी

अखेर GR आला; भोगवटादार वर्ग २ ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यास शासनाची मंजुरी Varg 2 Jamin GR

Varg 2 Jamin GR 2026

भोगवठादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. शासनाने 14 जानेवारी 2026 रोजी एक राजपत्र निर्गमित करून राज्यातील वर्ग दोनच्या जमिनी ( Varg 2 Jamin ) एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला नाही.असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन,हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो.अशा जमीनी विक्री साठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आणि नागरिकांकडे भोगवटादार (Bhogvathadar Varg 2 ) म्हणून असलेली जमीन असून, त्या जमिनीवर काही अटींसह मालकी असते. मात्र, वर्ग 2 मधील जमिनीचा वापर मर्यादित स्वरूपाचा असतो आणि विक्री, गहाण किंवा हस्तांतरण करताना सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते. त्यामुळे अनेक जण वर्ग 2 मधील जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतात. वर्ग 1 जमिनीला पूर्ण मालकी हक्क प्राप्त होतो आणि तिचा व्यवहार अधिक सुलभ होतो.

शासनाच्या माध्यमातून विविध प्रकाराच्या अंतर्गत प्रदान केलेल्या जमिनी वरती भोगवटदार वर्ग दोन जमीन अशी नोंद लागते त्यामुळे नागरिकांना त्या जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही किंवा इतर काही प्रयोजनासाठी ते जमिनी वापरता येत नाही.

त्याच्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. भोगवठादार वर्ग 2 च्या जमिनीवर ( Varg 2 Jamin )जर पुढील काही कारवाई करायची असेल, शेतकऱ्यांना त्याची खरेदी विक्री करावयाची असेल किंवा इतर काही काम असतील तर त्या जमिनीला वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करावे लागते.

राज्यातील भोगवठादार वर्ग दोनच्या जमिनी ( Varg 2 Jamin) वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ची मुदत होती. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्या माध्यमातून एका पत्राद्वारे या वर्ग दोनच्या जमिनीवर एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातील विनंती केली होती.

याचबरोबर इतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केलेली मागणी आणि नागरिकांच्या असलेल्या मागण्या या लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून 14 जानेवारी 2026 रोजी एक राजपत्र निर्गमित करून वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

हे राजपत्र 11 फेब्रुवारी 2026 पासून राज्यामध्ये लागू होणार आहे

प्रदान करण्यात आलेली भोगवठादार वर्ग 2 ची जमीन कोणत्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यानुसार त्याला नजराणा भरावा लागतो. त्या क्षेत्रामध्ये असलेल्या जमिनीनुसार अधिकारी प्राधिकृत केलेले असतात आणि त्या अधिकाऱ्याच्या मंजुरी नुसार त्या जमिनी दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित केल्या जातात.

14 जानेवारी 2026 राजपत्र नुसार या नियमाला भोगवठादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 रूपांतरण नियम 2026 असं देण्यात आलेले आहे.

ज्या जमिनी दहा वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रदान करण्यात आलेले आहेत, कुठल्याही अटी शर्थीचे उल्लंघन करण्यात आलेले नाही अशा  जमिनीचं भोगवटदार वर्ग दोन मधून एक मध्ये रूपांतर करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

वेगवेगळ्या जमिनीचे क्षेत्र महानगर प्रदेश, महानगरपालिका, नगरपरिषद व त्याची सीमावर्ती क्षेत्र याच्यासाठी वार्षिक दरविवरांना प्रमाणे प्रदान केलेल्या अशा जमिनीच्या मूल्याच्या 50% नजराणा भरावा लागणार आहे.

महानगर प्रदेश महानगरपालिका किंवा नगरपरिषद व त्यांच्या सीमावती क्षेत्र यामध्ये असलेल्या जमिनी व्यतिरिक्त इतर जमिनी यासाठी वार्षिकदर विवरण पत्राप्रमाणे प्रदान केलेल्या अशा जमिनीच्या मूल्याच्या 50% अशा प्रकारे नजराना भरावा लागणार आहे.

याच्या व्यतिरिक्त सुद्धा युक्त अधिनियमाच्या कलम 27 केलेल्या आणि वाटपानंतर बदल करण्यात आलेले आहेत अशा जमिनीसाठी भोगवटदार वर्ग दोन मधून एक मध्ये रूपांतर करण्यासाठी देखील नजराणा भरावा लागणार आहे.

जसे शेतीच्या प्रयोजनासाठी वापरले जमीन यासाठी वार्षिक विवरण पत्राप्रमाणे प्रदान केलेले जमिनीच्या मूल्याच्या 50% औद्योगिक आणि बिगर शेतीसाठी जमीन असेल याच्यामध्ये सुद्धा या मूल्याच्या 50%नजराणा असेल.

महानगरपालिका प्रदेश नगर परिषद आणि त्याची सीमावर्ती शेत्र असलेल्या जमिनी व्यतिरिक्त जमिनीला सुद्धा  50% 50% अशा प्रकारे नजराणा घेतला जाणाऱ आहे.

ज्या प्रकरणांमध्ये रूपांतरण मूल्य एक कोटी पेक्षा जास्त असेल अशा प्रकारणामध्ये राज्य शासनाचे पूर्व मान्यता घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी वर्ग दोन जमिनीचे मध्ये रूपांतर करू शकणार नाही.

किंवा त्याच्यामध्ये कोणतेही आदेश पारित करणार नाहीत अशा प्रकारची माहिती सुद्धा या नियमात देण्यात आलेली आहे.

राज्यात 11 फेब्रुवारी 2026 पासून हा कायदा लागू होणार आहे.

14 जानेवारी 2026 हे राजपत्र आपण डाऊनलोड करू शकता याची लिंक खाली देण्यात आलेली आहे.

View Gazettes GR PDF Download HERE

भोगवठादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी अर्ज नमुना खालील लिंक वर मिळेल.

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्जाचा नमूना

https://www.prabhudevalg.com/2025/06/2-1-varg-2-jamin.html

Varg 2 Jamin Arj Namuna

PDF