tur msp 2025 तुरीच्या हमीभाव खरेदी नोंदणीला सुरुवात

tur msp 2025

हमीभावाने तूर खरेदीसाठी अखेर २० जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. सोयाबीन खरेदीसाठी सुरू असलेल्या ९३४ खरेदी केंद्रावर नोंदणी Tur MSP 2025

tur msp 2025

tur msp 2025 Procurement Maharashtra

राज्यात तूर कापणी सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केली जाते ती म्हणजे तुरीच्या हमीभावाने खरेदीची.

राज्य शासनाने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

राज्यातील ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदी साठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘किंमत समर्थन योजनेअंतर्गत (#PSS) सुमारे २६९६ कोटी रुपयांच्या निधीतून ही तूर खरेदी केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याचा थेट लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या बैठकीस राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल व केंद्रीय कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात 20 जानेवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये तुरीच्या हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून 2025 26 करता हमीभाव जाहीर केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुरीच्या हमीभावामध्ये 450 रुपयांना वाढ करून 2025 चे हंगामासाठी आठ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा तुरीचा हमीभाव निश्चित केलेला आहे.

यावर्षीचे जे राज्यातील तुरीचे उत्पादन उत्तम होणार आहे, यामुळे खरेदीसाठी नोंदणी कधी सुरू होणार यासाठी मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती.

अखेर 20 जानेवारी 2026 पासून या नोंदणी सुरू करण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात सध्या सुरु असलेली सोयाबीनसाठीचे हमीभाव खरेदी केंद्र आहेत ज्या ठिकाणी सोयाबीन साठी हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी केली जाते त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, फार्मर आयडी नंबर आणि आधार कार्ड असलेला संलग्न असलेल्या बँक खात्याचा पासबुक अशा प्रकारची माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता.