Smart Scheme छतावरील सोलर; राज्य शासनाचे 95% अनुदान

Smart scheme Solar 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना छतावरील सोलर, शासनाची नवीन योजना.

Smart Scheme

Smart Scheme Rooftop solar anudan

राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या महावितरणच्या दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांसाठी राज्य शासनाची  “स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (SMART scheme) सोलर योजना”

“स्वयंपूर्ण महाराष्ट्र  रूफटॉप (SMART) सोलर या योजने मुळे होणार स्वावलंबनाकडे वाटचाल.

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना ऊर्जेत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सरकारने राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांसाठी “स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (SMART scheme) सोलर योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेमुळे राज्यात सौरऊर्जेच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असून स्थानिक रोजगारनिर्मितीबरोबरच पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वाटचाल साधली जाणार आहे.

स्मार्ट योजनेअंतर्गत राज्यात 2027 पर्यंत पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौरऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानातून सहाय्य करण्यात येणार आहे.

यात 1.5 लाख दारिद्र्यरेषेखालील तर 3.5 लाख इतर लाभार्थी लाभासाठी पात्र असतील.

या योजनेत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना प्रथम प्राधान्य, तर इतर पात्र ग्राहकांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर लाभ दिला जाईल.

SMART Scheme अनुदान मर्यादा

स्मार्ट योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना १ किलोवॅट क्षमतेचे छतावरील सोलर प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ₹३०,००० आणि राज्य शासनाकडून ₹१७,५०० अनुदान मिळणार आहे.

तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना (१०० युनिटपेक्षा कमी वापर असलेल्यांना) १ किलोवॅट क्षमतेचे छतावरील सोलारसाठी केंद्र शासनाच्या ₹३०,००० अनुदानाबरोबर राज्य शासनाकडून आणखी ₹१०,००० मिळतील.

याचबरोबर राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना स्मार्ट योजनेअंतर्गत  राज्य शासन ₹१५,००० पर्यंत अनुदान देणार आहे, तर पीएम सूर्य घर योजनेतून 30,000 रुपये अनुदान मिळेल.

एक किलोवॅट सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे अशा ग्राहकांना स्वतःची वीज गरज भागवून उर्वरित वीज महावितरणला विकण्याची संधी मिळते. प्रकल्पातून सुमारे २५ वर्षांपर्यंत वीजनिर्मिती होऊ शकते, त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक बचत साधता येते.

स्मार्ट ( Smart scheme)  योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मार्फत करण्यात येणार आहे.

महावितरण पात्र ग्राहकांची पडताळणी करून छतावरील जागेची तपासणी करून सौर प्रणाली बसवेल. बसविलेल्या प्रणालीची ५ वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादाराकडे राहणार आहे.

योजनेअंतर्गत वापरले जाणारे सर्व सोलार मॉड्यूल्स भारतीय निर्मित आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणित दर्जाचे असतील.

स्मार्ट योजनेमुळे राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे वीजबिल जवळपास शून्याच्या पातळीवर येईल. महाराष्ट्र शासनाचा उद्देश “प्रत्येक घर ऊर्जेत स्वयंपूर्ण, पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडविणे” हा असून, ‘SMART सोलार योजना’ हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

राज्यातील जास्ती जास्त घरगुती विजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरण, कार्यालय यांनी आवाहन केले आहे.

Smart roof Top Solar scheme GR

Smart Scheme GR PDF https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510061736312910.pdf

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *