Skymet Monsoon Forecast 2026 शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा, कमी पावसाचे संकेत

स्कायमेट वेदर कंपनीच्या अंदाजानुसार दुष्काळाचे सावट, अल निनोचा प्रभाव राहणार पहा कसेल पावसाळा. कोणत्या भागात कसा राहील पाऊस Skymet Monsoon Forecast 2026

Skymet Monsoon Forecast

Skymet Monsoon Forecast 2026 Declared

मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर स्कायमेट हवामान कंपनी च्या माध्यमातून २०२६ चा मान्सून चा अंदाज वर्तविण्यात आला आहे. स्कायमेट ही भारतातील एक अग्रगण्य हवामान अंदाज आणि कृषी जोखीम निवारण कंपनी आहे. स्कायमेट च्या माध्यमातून वर्तविण्यात आलेल्या या हवामान अंदाजानुसार देशात पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) ९४% इतका सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत एल निनो अधिक तीव्र होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्यात अर्थात ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

स्कायमेट हवामान कंपनी च्या माध्यमातून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार मध्य भारतासह, वायव्य भारताला दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. या अंदाजानुसार जून महिन्यात पाऊस सामान्य राहील मात्र जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस कमी राहणार आहे. स्कायमेट ने वर्तविलेल्या हवामानच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी ८१७ मिलिमीटर अर्थात येणारा मान्सून ८६८.६ मिमीच्या दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) ९४% (+/-५% च्या त्रुटीसह) इतका राहील.

स्कायमेट वेदर ने वर्तविलेल्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट महिन्यासाठी मान्सूनची शक्यता खालीलप्रमाणे असणार आहे.

  • ११०% पेक्षा जास्त अर्थात अतिरिक्त पावसाची शक्यता ०%
  • सामान्यपेक्षा जास्त अर्थात १०५ ते ११०% पावसाची शक्यता १०%
  • सामान्य पावसाची अर्थात ९६ ते १०४%  शक्यता २०%
  • सामान्यपेक्षा कमी अर्थात ९० ते ९५% पावसाची शक्यता ४०% आहे.
  • यामध्ये दुष्काळाची शक्यता अर्थात ९९% पेक्षा कमी पर्जन्यमान ची शक्यता ३०% आहे.

पावसाळ्यातील महिन्यानुसार अंदाज पाहिला तर

जून मध्ये पाऊस  LPA च्या १०१% इतका राहू शकतो. यामध्ये सामान्य पावसाची शक्यता ७०%, सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता १०%, सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता २०% आहे

जुलै महिन्यासाठी हे प्रमाण ९५% इतके वर्तविण्यात आले आहे.यामध्ये ४०% शक्यता सामान्य, सामान्यपेक्षा जास्त होण्याची २०% शक्यता, सामान्यपेक्षा कमी होण्याची ४०% शक्यता.

ऑगस्ट मध्ये  एलपीएच्या ९२% पाऊस राहील. यात सामान्य पावसाची २०% शक्यता, सामान्यपेक्षा जास्त पावसाची २०% शक्यता, तर सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची  ६०% शक्यता आहे.

तर सप्टेंबर मध्ये एलपीएच्या ८९% इतका पाऊस पडेल यामध्ये सामान्य पावसाची २०% शक्यता, सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची १०% शक्यता, तर सामान्यपेक्षा कमी होण्याची ७०% शक्यता आहे.