Shetrasta Kayda शेतरस्त्यांचे वाद, अडथळे आणि रस्ता बंद होण्याला मिळनार पूर्णविराम, शेतस्त्याची नोंद होणार सातबाराला

Shetrasta Kayda
शेतीला रस्ता ही अतिशय महत्वाची बाब आहे. याच अनुषंगाने महसूल विभाग शेतरस्ता संदर्भात विविध उपक्रम राबवत आहे.
आपण पाहिलेले आहे की राज्यामध्ये शेत रस्ते मोकळे करण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे.
शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकरणाच्या मदतीने शेती करता यावी, शेतमाल बाहेर काढता यावेत या अनुषंगाने मोठे रस्ते अर्थात बारा फुटापर्यंत चे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र हे सर्व होत असताना नवीन रस्त्याची मागणी असेल किंवा जुने रस्ते मोकळे करणे असेल या प्रक्रिया पार पडल्यानंतर काही कालांतराने या रस्त्यांवरती पुन्हा अतिक्रमण होतात रस्ते आडवले जातात, वाद विवाद होतात.
याच्यावरती कुठेतरी मार्ग निघावा, या सर्व बाबींना, या सर्व वादांना पूर्णविराम मिळावा म्हणून महसूल विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तो म्हणजे शेत रस्त्याची नोंद ही त्या सातबारा मध्ये इतर हक्कांमध्ये नोंदवली जाणार आहे. अशा प्रकारे नोंदी नोंदवली गेल्यामुळे साहजिकच रेकॉर्ड राहनार आहे.
भविष्यामध्ये जरी या रस्त्यांच्या संदर्भातील काही वाद निर्माण झाले अतिक्रमण झाले किंवा कोणी रस्ते जरी अडवले तरी त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी वेळ लागणार नाही.
यामुळे अतिशय आवश्यक असलेला बदल शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेल्या आता जे काही नवीन पर्याय रस्ते दिले जातील जे अतिक्रमित रस्ते ते मोकळे केले जातील किंवा नवीन रस्त्याचे निर्मिती केली जाईल या सर्व रस्त्याचे नोंद आता त्या सातबारावरती इतर हक्कांमध्ये नोंदवली जाणार आहे.


