महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदभरती साठी साठी शारीरिक चाचणी कार्यक्रम जाहीर. Police Bharati 2026

police Bharati Physical Test Time table
अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यास मंजुरी.
या शारीरिक चाचणी करीत पात्र झालेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या तयारीच्या दृष्टीने याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.




