जाणून घेऊयात काय आहेत शेतमालाचे हमीभाव msp 2025
शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी शेतमालाचे हमीभाव अतिशय महत्वाचे असतात.
शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत ( MSP 2025) जाहीर केले आहेत.
MSP 2025 for Kharif crops


मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ कारळे (नायजरबियाणे) (प्रति क्विंटल 820 रुपये), त्यानंतर नाचणी (प्रति क्विंटल 596 रुपये), कापूस (प्रति क्विंटल 589 रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल 579 रुपये) करण्याची शिफारस केली आहे.
^ भात (अ श्रेणी), ज्वारी (मालदांडी) आणि कापूस (लांब धाग्याचा) यांच्यासाठी खर्चाचा डेटा स्वतंत्रपणे संकलित केलेला नाही.
2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत केलेली ही वाढ, 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट किमान आधारभूत किमती निश्चित करण्याच्या घोषणेशी सुसंगत आहे. बाजरी (63%) आणि त्यानंतर मका (59%), तूर (59%) आणि उडीद (53%) या पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक नफा मिळण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% जास्त नफा मिळण्याचा अंदाज आहे.
अलिकडच्या वर्षांत, सरकार डाळी तसेच तेलबिया आणि पौष्टिक-तृणधान्ये/श्रीअन्न यासारख्या धान्यांव्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला या पिकांसाठी जास्त किमान आधारभूत किमती देऊ करुन प्रोत्साहनही देत आहे.