GST Rate जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत GST चे नवीन दर निर्धारित करण्यास मंजुरी, GST परिषदेत १२ व २८ टक्के स्लॅब रद्द; शेती अवजारे, ट्रॅक्टर, ठिबकवर ५ टक्के GST rate

GST Rate change 2025
जैविक कीटकनाशके, खते, सिंचन साधने व इतर शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीवरील कर GST Rate 18% व 12% वरून 5% करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेती उत्पादनाचा खर्च कमी होईल.
“सर्वांसाठी विमा” या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कौन्सिलने सर्व व्यक्तीगत आरोग्य व जीवनविमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक जीवन विमा, आरोग्य विमा आणि कुटुंबातील सदस्यांसाठीच्या ‘फॅमिली फ्लोटर’ पॉलिसी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या पॉलिसी आता पूर्णपणे करमुक्त (GST Rate 0%) असतील. यासोबतच जीवनावश्यक औषधे, कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांवरही कोणताही कर लागणार नाही हा एक मोठा दिलासा आहे.
अन्नधान्य व आरोग्याशी संबंधित वस्तूंवरील करांच्या दरात कपात करून कर वर्गीकरणाची संख्या घटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी साबण, डिटर्जंट, टॅल्कम पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवरील करदर कमी करण्यात आले. वस्त्रोद्योगातील तयार कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील करदरही कमी करण्यात आले आहेत.
रोजच्या वापरातील वस्तू (GST Rate 5% ) हेअर ऑइल, साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल, किचनमधील भांडी, पॅकेज्ड नमकीन, भुजिया, सॉस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, लोणी (बटर), तूप आणि इतर सर्व पॅकेज्ड खाद्यपदार्थांवरील जीएसटी आता कमी करून GST rate 5% करण्यात आला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
White Goods उद्योगातील विशेषतः टीव्ही, एअर कंडिशनरवरील करांचे दर १८% करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खत निर्मिती क्षेत्रातील नायट्रस अॅसिड, अमोनिया, वस्त्रोद्योगातील सूत, तसेच चामड्यावरील दर कमी करण्यात आले आहेत.
यात मोठ्या गाड्या, ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकल, तंबाखू उत्पादने, पान मसाला, सिगारेट, कोल्ड्रिंक्स आणि कॅफीनयुक्त पेये आणि आलिशान वस्तूंवर आता GST Rate 40% लागेल. मात्र, हे दर तंबाखू उत्पादनांवर लगेच लागू होणार नाहीत.
पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी सिमेंटवरील कर २८% वरून १८% करण्यात आले आहेत.
लहान प्रवासी वाहने व मालवाहतूक वाहने यांवरील कर १८% करण्यात आला असून, यामुळे महाराष्ट्रातील वाहनउद्योग व निर्यात क्षेत्राला चालना मिळेल.
सर्व औषधांवर १२/१८% ऐवजी ५% कर आकारला जाईल, तसेच काही जीवनावश्यक औषधे करमुक्त करण्यात आली आहेत.
हे नवीन दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.