Mahavitaran IPO महावितरण कंपनी शेअर बाजारात एंट्री; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Mahavitaran IPO राज्य मंत्रिमंडळाच्या ७ एप्रिल २०२६ रोजी पार बैठकीत महावितरण चा IPO आणण्यास दिली मंजुरी, दोन स्वतंत्र कंपन्या होणार

Mahavitaran IPO

Mahavitaran IPO महावितरण कंपनी शेअर बाजारात

७ एप्रिल २०२६ रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत महावितरण संदर्भात कंपनीची आर्थिक पुनर्रचना व शेअर बाजारात IPO आणण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महावितरणच्या दोन स्वतंत्र कंपन्या करण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले. यामध्ये औद्योगिक वाणिज्यिक घरगुती व इतर सर्व बिगर कृषी ग्राहकासाठीची वितरण संस्था अशी एक स्वतंत्र कंपनी आणि कृषी वीज ग्राहकांना पुरवठा व सभधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एम एस ई बी सोलर ऍग्रो पॉवर लिमिटेड अशी एक स्वतंत्र कंपनी असे विभाजन करण्यासाठी सुद्धा या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.

पार पडलेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बिगर कृषी वितरण क्षेत्रातील महावितरण कंपनी या कंपनीला शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

महावितरण कंपनीने विविध पायाभूत योजनांसाठी घेतलेल्या सुमारे 32,679 कोटी रुपयांच्या कर्जास शासनाची हमी आहे या कर्जदायित्व पोटी महाराष्ट्र शासन पंधरा वर्षे मुदतीचे दीर्घकालीन सरकारी रोखे जारी करणार आहे यामुळे महावितरण वरील कर्जाचा बोजा कमी होऊन महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

महावितरणची आर्थिक स्थिती भक्कम करणे आणि वितरण व्यवस्थेत शाश्वता निर्माण करणे यासाठी ही पुनर्रचना केली जाणार आहे ऊर्जा क्षेत्रातील संधीचा लाभ घेण्यासाठी या दोन्ही कंपन्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत नियमक आयोगाच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू च्या धोरणात्मक उद्दिष्टानुसार एम एस सी बी सोलर ऍग्रो पावर लिमिटेड ही कंपनी 31 मे 2023 रोजी स्थापन करण्यात आलेली आहे या कंपनीच्या माध्यमातून शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याचे नियोजन व सोलर वर आधारित शेतकऱ्यांना वीज उपलब्धता करून देण्यासाठी संस्थात्मक आधार रचना केली जात आहे.

या महावितरणच्या दोन्ही कंपन्यांच्या स्थापनेमुळे कृषी औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांना स्थिर आणि अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मदत होणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी याची मदत होणार आहे.

कृषी क्षेत्राच्या सिंचनासाठी आवश्यक सौर ऊर्जा करणारा चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे हरित ऊर्जेच्या वापरासाठी राज्यामध्ये यामुळे प्रोत्साहन मिळेल तसेच घरगुती ग्राहकांना वीज दरामध्ये अधिक स्थिरता येणार आहे सेवा गुणवत्तेमध्ये सुधारणा डिजिटल बिलिंग व ग्राहक सेवा या अधिक सक्षम करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेले आहेत.