राज्यात महारेशीम अभियान राबविण्यास मंजुरी; नोंदणी सुरू. कशी करायची नोंदणी? कुठे करावी? वेळापत्रक पहा सविस्तर Mahareshim Abhiyan

MahaReshim Abhiyan 2026 Registraion start नोंदणी सुरू
राज्यात एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३- 2028 हे दि.०२ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
रेशीम उद्योग हा कृषि व वन संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. राज्यातील हवामान या उद्योगाला अतिशय पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास राज्यात भरपूर वाव आहे.
याच बाबीचा विचार करून राज्यात एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ या वस्त्रोद्योग धोरण कालावधीत रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी आणण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम विकास योजना रेशीम संचालनालयासह, कृषी विभाग व ग्रामविकास विभाग यांच्यामार्फत राबवली जात आहे.
राज्यात रेशीम शेती उद्योग व योजनेची माहिती शेतकरी व उद्योजकांपर्यत पोहचविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी सन २०१७ पासून महारेशीम अभियान राज्यात राबविण्यात येत आहे
राज्यात महारेशीम अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो तसेच रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिध्दी होते यास्तव राज्यात महारेशीम अभियान २०२६ राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
रेशीम अभियान २०२६ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पालघर या २१ जिल्हयांमध्ये दि. ४ फेब्रुवारी २०२६ ते दि.५ मार्च, २०२६ पर्यंत नोंदणी करता येईल.
तर रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराधीव व लातूर या जिल्यांमध्ये दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ते दि. ११ मार्च २०२६ या कालावधीत “महारेशीम अभियान-२०२६” करिता नोंदणी करता येईल.
राज्यात “महारेशीम अभियान-२०२६” राबविण्यासाठी संदर्भाधीन दि.१२ डिसेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे गठीत केलेल्या समित्या, अभियान राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना व कार्यपध्दती जशास तशा लागू राहणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत रेशीम संचालनालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा आपले सरकार पोर्टलवर जनतेकरिता उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नवीन शेतकरी/उद्योजक यांची नोंदणी आपले सरकार पोर्टलवर केली जाणार आहे. याचबरोबर राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिकस्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणूका असल्यास महारेशीम अभियान-२०२६ राबविताना आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.
शासन निर्णय येथे पहा GR.maharashtra.gov.in
GR PDF महारेशीम अभियान-२०२६ तुती / टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम
जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. ती लागवड व जोपासनेसाठी 682 मनुष्य दिवस व किटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवसांची मजुरी देण्यात येते.
https://www.prabhudevalg.com/2023/09/mahareshim-abhiyan-2023.html


