राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 सुरू झाला आहे. Mahadbt Portal या शेतकऱ्यांचे अर्ज NDKSP पोर्टल वर स्थलांतरित

Mahadbt Portal application Migration on NDKSP portal
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन चे अर्ज सुरू झालेले आहेत. त्याच्यासाठी NDKSP 2 पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे.
जी गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या अंतर्गत आहेत अशा गावातील शेतकऱ्यांचे अर्ज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 च्या पोर्टल वरती केले जात आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 .0 पोर्टल वर अर्ज स्थलांतरित करण्याचे काम सुरू असल्यामुळे या पोर्टल वरती वारंवार या मेंटेनन्सच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 मध्ये 7201 गाव आहेत.
या गावांमधील शेतकऱ्यांचे mahadbtfarmer scheme portal वर जे अर्ज आहेत ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा ज्या काही बाबी पोखरा योजनेच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत अशा सर्व बाबीचे अर्ज हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या NDKSP च्या पोर्टल वर स्थलांतरील करण्यात येत आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व गावातील ज्या अर्जांना पूर्वसंमती मिळालेले अशा पूर्वसंमती मिळालेल्या अर्जाची प्रक्रिया मात्र महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या महादबत portal च्या माध्यमातूनच राबवली जाणार आहे.
परंतु ज्या गावांची PoCRA 2.0 च्या अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या अंतर्गत निवड झालेली आहे अशा गावातील अद्याप पर्यंत पूर्वसंमती न मिळालेल्या, ज्यांच्या अर्जाची निवड झालेली आहे ज्यांनी कागदपत्र अपलोड केलेले असे अर्ज सुद्धा किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु अद्याप त्यांची निवड झाली नाही असे जे शेतकरी पाच हेक्टर पेक्षा कमी जमीन मर्यादा असलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे हे अर्ज आता NDKSP 2.0 च्या पोर्टल वरती बदल करण्यात आलेले आहेत.
अर्थात पुढील जे काही प्रक्रिया असतील तर काही लाभ असतील कागद पत्र अपलोड करणे असेल किंवा पुढील सर्व प्रक्रिया नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना च्या पोर्टल वरून केली जाणार आहे.
या निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांसाठी हे अतिशय दिलासादायक आहे कारण PoCRA 2.0 योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणारा अनुदान हे इतर योजनेच्या अनुदानापेक्षा जास्त आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत बऱ्याच बाबी 60% पर्यंत 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत निवडलेल्या गावातील MAHADBT प्रणालीवरील ज्यांची जमीनधारणा 5 हे. पर्यंत आहॆ अश्या शेतकऱ्यांचे पूर्वसंमती पूर्वीचे विविध स्तरावरील प्रलंबित खालील घटकांचे अर्ज MAHADBT वरून ना. दे. कृ. सं. प्र. पोर्टल वर वर्ग करण्यात आलेले आहेत.
- ठिबक सिंचन संच
- तुषार सिंचन संच
- वैयक्तिक शेततळे
- शेततळे अस्तरीकरण
- पाईप (अनु.जाती व अनु,जमातीतील लाभार्थी)
- पंप संच (अनु.जाती व अनु,जमातीतील लाभार्थी)
- सामुदायिक शेततळे
- फळबाग लागवड
- शेडनेटगृह /हरितगृहामधील लागवड साहित्य.
सदर अर्जाचे MIGRATION करण्याचे काम सध्या सुरु आहॆ. त्यानंतर सदर शेतकरी संबंधित घटकाचा लाभ प्रकल्पा मधून घेऊ शकतात.
अर्ज करण्यासाठी DBT पोर्टल लिंक 👇


