राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात MahaDBT Anudanअनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अशा शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी केंद्राला वाढीव निधीच मागणी

MahaDBT anudan Update 2026
पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे, राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अनुदानित बिल प्रलंबित असून कृषी यांत्रिकीकरण उप मिशन तसेच प्रति थेंब अधिक पीक या घटकांसाठी अतिरिक्त निधीची तातडीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मंजूर निधी अपुरा पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यकजे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कृषी भवन, नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन निधीच्या तरतुदीबाबत केंद्र सरकारला पत्र सादर केले.
या भेटीदरम्यान राज्यातील विविध कृषी योजना वर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात सुरु असलेल्या कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांची केंद्रीय कृषी मंत्र्यांनी माहिती घेऊन एआय कृषी धोरण व महाविस्तार एआय अॅपचे कौतुक केले असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या काही दिवसांत आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
MahaDBT Anudan या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत असून, उत्पादनवाढीस चालना मिळत आहे. त्यामुळे या योजनांची सातत्याने प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र व राज्य सरकार समन्वयाने कार्यरत असल्याचेही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
याप्रसंगी कृषी विभागाचे केंद्रीय प्रधान सचिव, महाराष्ट्र कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तसेच केंद्रातील कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.


