Lek Ladki Yojana लाडक्या लेकीसाठी शासनाचे ₹१ लाख अनुदान

Lek ladki Yojana 1 एप्रील 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या  सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

Lek Ladki Yojana

lek Ladki Yojana लेक लाडकी योजना

राज्यातील मुलींच्या सशक्त भविष्यासाठी एक ठोस आधार म्हणजे लेक लाडकी योजना.

आजही या आधुनिक युगात समाजात मुलींच्या जन्माकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलगी म्हणजे ओझे नसून कुटुंबाचा आणि समाजाचा अभिमान आहे, ही जाणीव अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘लेक लाडकी योजना’ १० ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींचा जन्म, शिक्षण आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रूपये,इयत्ता पहिलीत 6 हजार रूपये.सहावीत 7 हजार रूपये,अकरावीत 8 हजार रूपये तर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रूपये याप्रमाणे एकूण रूपये 1,01,000/-

लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश Aims Of Lek Ladki Scheme

  • मुलींच्या जन्माचे स्वागत होणे,
  • स्त्री भ्रूणहत्या रोखणे
  • मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.
  • मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, शाळाबाह्यय मुलींचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहीत करणे.
  • आर्थिक अडचणींमुळे शिक्षण खंडित होऊ न देणे मुलींमध्ये आत्मविश्वास व स्वावलंबन निर्माण करणे

ही योजना केवळ आर्थिक सहाय्यापुरती मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ ठरत आहे.लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते. मुलीच्या जन्मानंतर, शाळेत प्रवेश, शिक्षणातील विविध टप्पे पूर्ण केल्यानंतर थेट लाभ देण्यात येतो. यामुळे पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळतो आणि मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहते.

लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते.  यामध्ये मुलीच्या जन्मानंतर, शाळेत प्रवेश, शिक्षणातील विविध टप्पे पूर्ण केल्यानंतर थेट लाभ देण्यात येतो. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रूपये,इयत्ता पहिलीत 6 हजार रूपये.सहावीत 7 हजार रूपये,अकरावीत 8 हजार रूपये तर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रूपये याप्रमाणे एकूण रूपये 1,01,000/-एवढी रक्कम पाच हप्त्यात देण्यात येत.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी मुलीचा जन्म दाखला,
  • पालकांचे आधार कार्ड,
  • रहिवासी दाखला ,
  • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदारांकडून मिळालेले, वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे)
  • रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
  • बँक खात्याचे तपशील (बँक पासबुकची पहिल्या पानाची छायाप्रत – आधारशी लिंक असणे आवश्यक)
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (आई/वडिलांचे)
  • शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र (शिक्षण टप्प्यावरील लाभासाठी)
  • वयाचा १८ वर्षांनंतरचा पुरावा (मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शेवटच्या हप्त्यासाठी)
  • लाभार्थी मुलीचे आणि आईचे संयुक्त छायाचित्र
  • अपत्य/मुलीच्या अविवाहित असल्याचा स्व-घोषणापत्र

लेक लाडकी योजना पात्रता

  • १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली मुलगी या योजनेसाठी पात्र आहे.
  • लेक लाडकी योजना योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यांनतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागु राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • तसेच दुस-या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.मात्र त्यांनतर माता /पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यांनतर जन्माला आलेल्या दुस-या  मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र)ही योजना अनुज्ञेय राहील.मात्र पाता /पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक लाहील.
  • लाभार्थी बॅंक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे.
लेक लाडकी योजना लाभ

लेक लाडकी योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार पहिलीत ६ हजार, सहावीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपयांचे अनुदान टप्प्याटप्प्याने मिळते.

अ.क्र.तपशिलहप्तारक्कम रूपये
1मुलीच्या जन्मा नंतरपहिला हप्ता5000/-
2इयत्ता पहिलीतदुसरा हप्ता6000/-
3इयत्ता सहावीततिसरा हप्ता7000/-
4इयत्ता अकरा वीतचौथा हप्ता8000/-
5मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्या नंतरपाचवा हप्ता75000/-
एकुण101000/-
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपध्दती

लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रांमीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यांनतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

अर्ज जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद मध्ये जमा करता येतील. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थी यांनी आपले अर्ज थेट अंगणवाडी सेविका यांचेकडे जमा करून पर्यवेक्षिका यांचेमार्फत ऑनलाईन करून घ्यावे व पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ग्रामीण भागातील लाभार्थी यांनी आपले अर्ज थेट अंगणवाडी सेविका यांचेकडे जमा करून पर्यवेक्षिका यांचेमार्फत ऑनलाईन करून घ्यावे व पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

लेक लाडकी योजनामुळे पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळतो आणि मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहते.मुलीचे शिक्षण हेच सक्षम समाजाचे खरे भांडवल आहे. ही बाब लक्षात घेऊन या योजनेत शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मुलगी नियमित शाळेत जात असल्यास आणि शिक्षण सुरू ठेवल्यासच पुढील लाभ दिला जातो.

त्यामुळे शालेय गळती कमी होण्यास मोठी मदत होत आहे. मुलीचे शिक्षण हेच सक्षम समाजाचे खरे भांडवल आहे. ही बाब लक्षात घेऊन या योजनेत शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मुलगी नियमित शाळेत जात असल्यास आणि शिक्षण सुरू ठेवल्यासच पुढील लाभ दिला जातो. त्यामुळे शालेय गळती कमी होण्यास मोठी मदत होत आहे.सामाजिक बदलाची दिशा

सामाजिक बदलाची दिशा लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. ‘मुलगी म्हणजे लक्ष्मी’ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरू लागली आहे. ग्रामीण व शहरी भागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात आहे.

लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. ‘मुलगी म्हणजे लक्ष्मी’ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरू लागली आहे.

ग्रामीण व शहरी भागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात आहे.लेक लाडकी योजना ही केवळ एक सरकारी योजना नसून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. आज शिक्षण घेतलेली, आत्मनिर्भर झालेली मुलगी उद्याच्या समाजाची दिशा ठरवेल. शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यास स्त्री-पुरुष समानतेकडे एक मोठे पाऊल टाकले जाईल.

लेक लाडकी योजना ही केवळ एक सरकारी योजना नसून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. आज शिक्षण घेतलेली, आत्मनिर्भर झालेली मुलगी उद्याच्या समाजाची दिशा ठरवेल. शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यास स्त्री-पुरुष समानतेकडे एक मोठे पाऊल टाकले जाईल.

लेक लाडकी योजना ही मुलींच्या सन्मान, शिक्षण आणि सशक्तीकरणाची मजबूत पायाभरणी आहे. प्रत्येक कुटुंबाने या योजनेचा लाभ घ्यावा आणि ‘लेक म्हणजे लाडकीच’ ही भावना समाजमनात रुजवावी, हीच काळाची गरज आहे.

लेक लाडकी योजना ही मुलींच्या सन्मान, शिक्षण आणि सशक्तीकरणाची मजबूत पायाभरणी आहे. प्रत्येक कुटुंबाने या योजनेचा लाभ घ्यावा आणि ‘लेक म्हणजे लाडकीच’ ही भावना समाजमनात रुजवावी, हीच काळाची गरज आहे.