Ladki Bahin KYC Problem लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींना दिलासा; होणार फेरतपासणी

Ladki Bahin

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण ( Ladki Bahin ) योजनेअंतर्गत KYC करत असताना चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ बंद झालेल्या महिलांची होणार फेरतपासणी. Ladki Bahin Kyc Problem

Ladki Bahin Kyc Problem

Ladki Bahin KYC Problem

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेंतर्गत (Ladki Bahin) पात्र महिलांची ई-केवायसी करतांना चूकीचे पर्याय निवडण्यात आल्याने अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे.
राज्यातील एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. शासनाच्या सूचनेप्रमाणे लाभ बंद झालेल्या प्रत्येक महिलेच्या अर्जाची फेरतपासणी करावी अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.

हप्ते बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ सुरु होण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर विशेष शिबिरे आयोजित करा, असे ही निर्देश देण्यात आले आहेत.

ई-केवायसीत पर्याय निवडतांना गल्लत झाल्याने अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे अशा अनेक तक्रारी राज्यातून प्राप्त होत आहेत यासाठी मंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत.

राज्यस्तरावरून ई-केवायसीमुळे अपात्र झालेल्या महिलांची यादी प्रत्येक जिल्ह्यास प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांना यादी देण्यात येईल. यातून ग्रामस्तरावर अपात्र महिलांची फेरतपासणी करावे. त्यासाठी विशेष शिबिरे घेतली जावीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याकामाकरीता अंगणवाडी सेविकांना नेमण्यात आले असले तरी तलाठी व ग्रामसेवक यांची मदत घ्या. शहरी भागासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सेवा घ्याव्यात अशा सूचनाही केल्या आहेत.

महिला व बालविकासच्या पर्यवेक्षकांनी या कामावर दैनंदिन नियंत्रण ठेवावे आणि संबंधित गटविकास अधिकारी यांनी फेरतपासणीचे काम कालमर्यादेत पुर्ण करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Ladki Bahin KYC चुकलेल्या महिला लाभार्थ्यांनी आपला आधारकार्ड नंबर व मोबाईल क्रमांक द्यावा असेही सांगण्यात आले आहे.

ई-केवायसीत महिलांचे अर्ज बाद झाले असले तरी फेरतपासणीनंतर ते पुन्हा पात्र होणार आहे. त्यामुळे लाभ बंद झालेल्या महिलांनी भिती बाळगू नये.

लाभ बंद झालेल्या महिलांनी आपले आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा, असे आवाहन ही करण्यात आले आहे.

Ladki Bahin Kyc Problem