Ladki Bahin EKYC लाडकी बहीण योजना ई-केवायसी दुरुस्ती; 30 Aprilपर्यंत मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याने हप्ते बंद झालेल्या महिलांना Ladki Bahin EKYC दुरुस्तीचा पर्याय, 30 April पर्यंत मुदत

Ladki Bahin EKYC

Ladki Bahin EKYC online Correction Start

राज्यात महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांची Ladki Bahin EKYC करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली.

या प्रक्रियेत बऱ्याच महिला लाभार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची चुकीची उत्तर दिल्याने या महिलांचे हप्ते येणे बंद झाले होते यास्तव शासनाने महिला व बालविकास विभागाच्या 6 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध दिली आहे.

यामुळे आता या चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांना दुरुस्ती करता येणार आहे.

या Ladki Bahin EKYC प्रक्रियेत 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यापैकी अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायम/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे हा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा हो असा पर्याय निवडला होता.

अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा 30April 2026 पर्यंत https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार 30 April 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत Ladki Bahin EKYC दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही, याची संबंधित लाभार्थींनी नोंद घ्यावी.

ई-केवायसीमधील चुका दुरुस्त करण्याची ही अंतिम संधी असल्याने पात्र लाभार्थी महिलांनी निर्धारित मुदतीपूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी.

अशी करा Ladki Bahin KYC दुरुस्ती