Farmer Id तुमचं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनलं का?

Farmer Id देशभरात agri stack scheme च्या अंतर्गत शेतकऱ्यांना एक विशिष्ठ ओळखपत्र क्रमांक दिला जात आहे. कशासाठी, फायदे काय घेऊयात जाणून

Farmer Id

Farmer Id Agristack scheme

कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून, शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्यात येत आहेत.

राज्यात राबविल्या जाणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे.

What is Farmer ID Agri stack scheme

केंद्र शासनाच्या माध्यमातून पिक, जमीन, उत्पादन या सर्वांची आकडेवारी मिळविण्यासाठी आणलेली एक डिजिटल योजना म्हणजे Agristack scheme.

ऍग्रीस्टॅक ही डिजिटल शेतीची क्रांतिकारक संकल्पना आहे, जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि शासन यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडते. या माध्यमातून शेतीसंबंधी सर्व माहिती अचूक, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होते.

यामध्ये Farmer ID अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक हा एक अद्वितीय ओळख क्रमांक असून तो ऍग्रीस्टॅक अंतर्गत तयार केला जातो. यात शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, जमीन मालकी (सातबारा उतारा) यांसारखी माहिती समाविष्ट असते.

Importance of Farmer ID

फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना पुढील सुविधा मिळतात.

प्रधानमंत्री किसान, पिक विमा, नुकसान भरपाई, महाडीबीटीसारख्या योजनांचा थेट लाभ,

डिजिटल कर्ज वितरण जलदगतीने,

किमान आधारभूत किंमत नोंदणी व पारदर्शक व्यवहार, विविध शासकीय योजनांमध्ये अडथळे विना प्रवेश

फार्मर आयडीच्या माध्यमातून हवामान अंदाज, मृदा आरोग्य माहिती, पिक सल्ला यांसारख्या अचूक आणि वैयक्तिक सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध होतात.

अतिउत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन शेतकरी नवीन तंत्रज्ञान, योग्य सरकारी मदत आणि डिजिटल माहितीचा उपयोग करून अधिक उत्पादन आणि नफा मिळवू शकतात.

शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी व पारदर्शकपणे मिळावा, यासाठी ऍग्रीस्टॅक प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या डिजिटल उपक्रमामुळे शेती क्षेत्रात क्रांती घडणार असून प्रत्येक शेतकऱ्याचा डेटा सुरक्षित, अचूक व सुलभ होईल.

शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपला ऍग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी त्वरित तयार करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *