eklavya school exam मॉडेल स्कूल eklavya school exam एकलव्य स्कुल प्रवेश परीक्षा वेळापत्रक जाहीर; प्रवेश परीक्षा 1 मार्च रोजी होणार

eklavya school exam Date 2026
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुल मध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
eklavya school exam Date 2026 इयत्ता 6 वी साठी नियमित प्रवेश आणि इयत्ता 7 वी ते 9 वी मधील रिक्त जागांसाठी रविवार, 01 मार्च 2026 रोजी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
eklavya school Admission प्रवेश तपशील
• परीक्षेची तारीख व वेळ: 01 मार्च २०२६, सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत.
• इयत्ता ६ वी साठी वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी १.०० पर्यंत.
• इयत्ता ७ वी ते ९ वी साठी वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत.
• प्रवेश क्षमता: प्रत्येक एकलव्य शाळेत इयत्ता ६ वी साठी ३० मुले आणि ३० मुली अशी एकूण ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे.
eklavya school exam Date 2026 Eligibility
• विद्यार्थी अनुसूचित/आदिम जमातीचा (S.T.) असणे बंधनकारक आहे.
• विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹ ६ लाखांपेक्षा कमी असावे.
• शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी किंवा ८ वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अनुक्रमे इयत्ता ६ वी, ७ वी, ८ वी किंवा ९ वी करिता प्रवेशास पात्र असतील.
परीक्षा केंद्र eklavya school exam Centre’s
• अक्कलकुवा तालुका: शासकीय आश्रमशाळा, तालंबा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार.
• धडगांव तालुका: शासकीय आश्रमशाळा, सलसाडी, ता. तळोदा, जि. नंदुरबार .
• तळोदा तालुका: शासकीय आश्रमशाळा, अलिविहीर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार
अर्ज प्रक्रिया eklavya school exam Admission Form
• अर्ज करण्याची अंतिम मुदत: २० फेब्रुवारी २०२६.
• अर्ज कुठे मिळतील/स्विकारले जातील:
अर्ज प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे तसेच एकलव्य शाळा सलसाडी, अलिविहीर व तालंबा येथे उपलब्ध असती. प्रकल्प कार्यालयात अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
• अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे: जन्म दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, पालक व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जातीचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती.
परीक्षेसाठी सूचना eklavya school exam Guidelines
• विद्यार्थ्यांनी सकाळी ९.०० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
• आवश्यक साहित्य: स्वतःचे आधार कार्ड, निळा पेन, पेपर पॅड आणि पाण्याची बॉटल.
• मनाई असलेले साहित्य: बॅग, पुस्तके, मोबाईल, डिजिटल घड्याळ किंवा इतर कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास परवानगी नाही.
प्रवेश प्रक्रिया व प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यालयाशी संपर्क साधता येईल, असेही प्रकल्प अधिकारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


