Divyang Scholarship Yojana 2026 महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; दिव्यांग शिष्यवृत्तीत मोठी वाढ!

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ Divyang Scholarship Yojana 2026

Divyang Scholarship Yojana

Divyang Scholarship Yojana 2026 Cabinet Approves Ammendment

राज्य मंत्रिमंडळाने १ एप्रिल २०२६ रोजी एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिशुवर्ग ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने दिव्यांग विध्यर्थ्यंच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याची मागणी होत होती. महागाई आणि शिक्षणाचा खर्च विचारात घेऊन, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला आता अधिकृत मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे शिशुवर्ग ते आठवी, नववी ते दहावी तसेच अकरावी व बारावीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ होणार आहे.

महाराष्ट्राच्या व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास वृध्दिंगत करणे असा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला आहे, याच मुद्द्याला अनुसरून दिव्यांग विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना 8 ते 34 वर्षे जुन्या आहेत.या योजना मध्ये बदल करण्याची याचप्रमाणे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मंजुरीनुसार राज्यातील सर्व दिव्यांगत्वाच्या २१ प्रकारातील शिशुवर्ग ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मंजुरीनुसार राज्यातील सर्व दिव्यांगत्वाच्या २१ प्रकारातील नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 800 रूपये (निवासी), 600 रूपये (अनिवासी) एवढी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तर अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रूपये (निवासी), 800 रूपये (अनिवासी) शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय अकरावी व बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा 150 रूपये वाचक भत्ता आणि दरवर्षी प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत 1500 रूपये अभ्यास दौऱ्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

Divyang Scholarship Yojana 2026 या वाढीव शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 23 कोटी 11 लाख रूपयांच्या आवर्ती तरतुदीस मान्यता देण्यात आली.