डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना योजनेतून शेतकऱ्यांना नवीन विहिरीसह, बोर, सूक्ष्म सिंचन अशा विविध बाबींचा लाभ, पहा काय आहे BAKSY Scheme सविस्तर.

BAKSY Scheme babasaheb ambedkar krushi swavalamban yojana
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष घटक योजना सुधारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
BAKSY Scheme या योजनेचे घटकनिहाय आर्थिक मापदंड वाढविणे, निकषांमध्ये सुधारणा करून, यात नवीन घटकांचा समावेश करण्यास दि.३० सप्टेंबर, २०२४ रोजी झालेल्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे.
BAKSY Scheme अनुदान मर्यादा

BAKSY Scheme योजनेच्या अटी व शर्ती
नवीन निकषानुसार या योजनेत नवीन विहीरीबाबत रू ४ लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहीरीची खोली असावी, १२ मीटर खोलीची अट रद्द करण्यात आलेली आहे.
babasaheb ambedkar krushi swavalamban yojana या योजनेअंतर्गत महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर खोदता येणार नाही.
नवीन निकषानुसार आता दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अट रद्द करण्यात आलेली आहे.
नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास २० वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेता येईल.
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेबरोबरच इतर योजनेंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यात आलेल्या तसेच स्वखर्चाने शेततळे केलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळणार आहे.
लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरीत आवश्यक घटकांचा लाभ विहीत मर्यादेत देण्यात येईल. (उदा. विहीर असल्यास वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन संच, विहीर व पंपसंच असल्यास सूक्ष्म सिंचन संच इ.) उपरोक्त घटकांचा लाभ घेतल्यानंतरही लाभार्थ्यांने इनवेल बोअरींग व परसबाग या घटकांची मागणी केल्यास विहीत मर्यादेत सदर घटकांचा अतिरिक्त लाभ देण्यात येणार आहे.
नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण किंवा पाण्याचा स्रोत उपलब्ध असणाऱ्या लाभार्थ्यांची या योजनेंतर्गत एखाद्या घटकासाठी निवड झाल्यास त्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून प्राथम्य क्रमाने पंपसंच मंजूर करण्यात येईल.
विशेष घटक योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास पंपसंच देणे आवश्यक असल्यास, पंपसंचाचा प्रस्ताव, कृषी विकास अधिकारी यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची पंपसंचाची योजना राबविणाऱ्या यंत्रणेकडे पाठवून प्राथम्य क्रमाने पंपसंच मंजूर करून केला जाईल.
लाभार्थ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर, पंपसंच व वीज जोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रु.५०,०००) लाभार्थी हिस्सा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनेतून महावितरण कंपनीकडे भरण्यात येईल.
Package अ) नवीन विहीर, आ) जुनी विहीर दुरुस्ती, इ) शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण BASKY Scheme
अ) नवीन विहीर पॅकेज
नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास नवीन विहीर, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु. ६,४२,०००/रु.६,९२,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (विहीर- रु.४,००,०००+ इनवेल बोअरिंग-रु.४०,०००+ वीज जोडणी आकार रु.२०,०००+ विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन – रु.४०,००० किंवा सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु.५०,०००+ एचडीपीई/पीव्हीसी पाईप रु. ५०,००० तुषार सिंचन संच रु. ४७,०००/ठिबक सिंचन संच-रु. ९७, ०००+ यंत्रसामुग्री रु.५०,०००+ परसबाग- रु.५,००० रु. ६,४२,०००/ रु.६,९२,०००)
जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज BASKY Scheme
जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास जूनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु. ३,४२,०००/रु. ३,९२,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (जूनी विहीर दुरुस्ती- रु.१,००,०००+ इनवेल बोअरिंग-रु.४०,००० वीज जोडणी आकार-रु.२०,००० + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु.४०,००० किंवा सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)-रु.५०,००० एचडीपीई/पीव्हीसी पाईप-रु.५०,००० तुषार सिंचन संच-रु.४७,०००/ठिबक सिंचन संच रु.९७,०००+ यंत्रसामुग्री रु.५०,०००+ परसबाग- रु.५,०००0 = रु.३,४२,०००/ रु.३,९२,०००)
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज BASKY Scheme
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु. ४,०२,०००/रु. ४,५२,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण रु.२,००,००० वीज जोडणी आकार- रु.२०,००० + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन रु.४०,००० किंवा सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)-रु.५०,००० + एचडीपीई/पीव्हीसी पाईप रु.५०,००० + तुषार सिंचन संच- रु.४७,०००/ठिबक सिंचन संच रु.९७,०००+ यंत्रसामुग्री-रु. ५०,००० परसबाग-रु.५,००० रु.४,०२,०००/रु.४,५२,०००)
BASKY Scheme पात्रतेच्या अटी:
- लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.
- शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याच्या नावे जमिन धारणेचा ७/१२ दाखला, ८-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील.
- सदर योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली रु.१,५०,००० वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर एवढी शेत जमीन असणे आवश्यक असेल. मात्र, लाभार्थ्यांची जमीन दुर्गम भागात व विखंडीत असल्याने ०.४० हे. पेक्षा कमी जमीन धारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमीन किमान ०.४० हे. इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. त्याचप्रमाणे दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल ६.० हे. धारणक्षेत्राची अट लागू असणार नाही.
- एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास किंवा कुटूंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही.
इच्छुक लाभार्थ्यांनी कृषि विभागाच्या महाडिबीटी पोर्टलद्वारे babasaheb ambedkar krushi swavalamban yojana योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक राहील
पहा कसा करायचा अर्ज babasaheb ambedkar krushi swavalamban yojana


