Adverse Possession जमिनीचा मालक कोण सातबारा धारक की कसणारा?

काय आहे Limitation Act 1963 मधील प्रतिकूल ताबा; १२ वर्षे ताबा असल्यास कसणारा जमिनीचा मालक होतो का? जाणून घेऊयात Adverse Possession

Adverse Possession

Adverse Possession limitation Act 1963

तुमची जमीन तुमची आहे असं तुम्हाला वाटतंय? पण जर तुम्ही १२ वर्षे लक्ष दिलं नाही, तर ती कायदेशीररीत्या दुसऱ्याची होऊ शकते! कारण कायद्यात तशी तरतूद आहे “प्रतिकूल ताबा”.

आज आपण ‘मर्यादा कायदा १९६३’ (Limitation Act 1963) मधील एका अशा नियमाबद्दल माहिती घेणार आहोत. या नियमाला ‘प्रतिकूल ताबा’ ( Adverse Possession ) म्हणतात.

‘प्रतिकूल ताबा’ (Adverse Possession) म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जमिनीवर त्या मूळ मालकाच्या परवानगीशिवाय, उघडपणे आणि सलग १२ वर्षे ताबा ठेवते, तेव्हा त्या व्यक्तीला ‘प्रतिकूल ताबा’ दावा दाखल करता येतो.

🚜 उदाहरण १: शेतजमिनीचा वाद (खाजगी जमीन)

धोंडिबा नावाचा एक शेतकरी आहे. त्याच्या शेजारी विठ्ठलचे शेत आहे. विठ्ठल शहरात नोकरीला गेल्यामुळे त्याचे अर्धा एकर शेत १०-१५ वर्षे पडीक होते. धोंडिबाने काय केले?, विठ्ठलला न विचारता त्या अर्ध्या एकरात पेरणी सुरू केली, तिथे स्वतःच्या खर्चाने कुंपण (Fencing) घातले, सलग १४ वर्षे धोंडिबा तिथे शेती करत आहे आणि गावकरीही त्यालाच त्या जमिनीचा वहिवाटदार मानतात. अशा परिस्थितीत जर या १४ वर्षात विठ्ठलने एकदाही कोर्टात किंवा पोलिसात तक्रार केली नसेल, तर मर्यादा कायदा (Limitation Act) १९६३ नुसार विठ्ठलचा त्या जमिनीवरचा हक्क संपू शकतो. धोंडिबा कोर्टात जाऊन ‘Adverse Possession’ नुसार मालकी हक्काचा दावा करू शकतो.

‘प्रतिकूल ताबा’ ( Adverse Possession ) सिद्ध करण्याच्या ३ मुख्य अटी

  • शांततापूर्ण ताबा – दावा करणाऱ्या व्यक्तीने ताबा घेण्यासाठी बळाचा वापर किंवा भांडण केलेले नसावे.
  • उघडपणे ताबा – दावा करणाऱ्या व्यक्तीने ताबा चोरून केलेला नसावा; तो मूळ मालकाला आणि गावाला दिसेल असा असावा (उदा. कुंपण घालणे, घर बांधणे).
  • मूळ मालकाच्या परवानगीशिवाय – सर्वात महत्त्वाचे म्हणजे केलेला ताबा हा मूळ मालकाच्या संमतीने किंवा भाडेकरू म्हणून नसावा.
हे दावे चालत नाहीत.
  • भाडेकरू (Tenant): भाडेकरू कितीही वर्षे राहिला तरी तो मालक होऊ शकत नाही, कारण हा ताबा मालकाच्या संमतीने केलेला असतो.
  • नातेवाईक: जर तुम्ही भावाला किंवा नातेवाईकाला जमीन सांभाळायला दिली असेल, तर तो मालकी हक्क सांगू शकत नाही.
  • सरकारी जमिनीसाठी प्रतिकूल ताबा दावा अडखळ करण्यासाठी मुदत ३० वर्षे आहे.

🏠 उदाहरण २: भाडेकरूचे उदाहरण ( कायदा लागू होत नाही) – रमेशने त्याचे एक घर सुरेशला भाड्याने (Rent) दिले. सुरेश त्या घरात सलग २० वर्षे राहत आहे. २० वर्षांनंतर सुरेशने कोर्टात दावा केला की, “मी इथे १२ वर्षांपेक्षा जास्त काळ राहतोय, त्यामुळे आता मी या घराचा मालक आहे.” येथे सुरेशला मालकी हक्क मिळणार नाही. का? कारण त्याने घरात प्रवेश करताना रमेशच्या ‘परवानगीने’ (भाडे करार करून) प्रवेश केला होता. कायद्यानुसार, जोपर्यंत ताबा ‘परवानगीने’ असतो, तोपर्यंत तो ‘प्रतिकूल’ (Hostile) मानला जात नाही.

प्रतिकूल ताबा दावा दाखल करण्यासाठी मर्यादा कायदा (Limitation Act), 1963 मधील तरतुदी (कलम ६४, ६५)

या कायद्यानुसार, खऱ्या मालकाने आपली जमीन परत मिळवण्यासाठी कोर्टात जाण्याची एक ठराविक मुदत असते. ती मुदत संपली की मालकाचा हक्क संपतो आणि कब्जा करणाऱ्याचा हक्क सुरू होतो.

मालमत्तेचा प्रकार दावा करण्याची मुदत

खाजगी जमीन (Private Property) १२ वर्षे

सरकारी जमीन (Government Property) ३० वर्षे

आवश्यक पुरावे (Documents Needed)

  • ७/१२ उतारा (7/12 Extract): पिकाची नोंद (पीक पाहणी) किंवा भोगवटादार म्हणून नाव.
  • कर पावती (Tax Receipts): मालमत्ता कर किंवा शेतसारा भरल्याच्या पावत्या.
  • वीज किंवा पाणी बिल: त्या पत्त्यावर अनेक वर्षांपासून राहत असल्याचा पुरावा.
  • साक्षीदार: शेजारील शेतकरी किंवा रहिवासी ज्यांनी तुम्हाला तिथे १२ वर्षांपासून पाहिले आहे.
मर्यादा कायदा (Limitation Act), 1963 नुसार प्रतिकूल ताबा सिद्ध करण्यासाठीच्या अटी (NEC नियम)

एखादी व्यक्ती केवळ त्या जमिनीवर राहते म्हणजे प्रतिकूल ताबा नव्हे, त्यासाठी दावा दाखल केल्या नंतर कोर्टात खालील गोष्टी सिद्ध कराव्या लागतात: न्यायालयाचा स्थगिती आदेश: जर त्या जमिनीवर कोर्टाचा कोणताही वाद किंवा स्थगिती असेल, तर तो काळ पकडला जात नाही.

  • सातत्य (Continuous): ताबा सलग १२ वर्षे असावा. त्यात कोणताही खंड पडलेला नसावा.
  • उघड ताबा (Open/Visible): ताबा लपून-छपून नसावा. तो मालकाला आणि समाजाला दिसेल असा असावा.
  • मालकी हक्काला आव्हान (Hostile): ताबा मालकाच्या परवानगीशिवाय (भाडेकरार किंवा संमतीशिवाय) असावा.
  • ताबा घेण्याचा हेतू (Animus Possidendi): कब्जा करणाऱ्याची भावना “मीच या जमिनीचा मालक आहे” अशी असावी.
जमीन मालक असाल तर हि काळजी नक्की घ्या

वेळोवेळी पाहणी: आपल्या जमिनीवर किंवा प्लॉटवर दरवर्षी किमान २-३ वेळा जाऊन पाहणी करा. ७/१२ उतारा: ७/१२ उताऱ्यावरील ‘पीक पाहणी’ किंवा ‘इतर हक्क’ कॉलममध्ये कोणा दुसऱ्याचे नाव तर येत नाहीये ना, याची खात्री करा.

कायदेशीर नोटीस: जर कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर १२ वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांना कोर्टामार्फत नोटीस द्या किंवा पोलिसात तक्रार करा. यामुळे त्यांचा ‘सलग’ (Continuous) ताबा खंडित होतो. #AdversePossession #LandLaw #LimitationAct1963 #MarathiKayda #FarmerLife