VMDDP Application start विदर्भ मराठवाडा मधील १९ जिल्ह्यात विदर्भ-मराठवाड्यात ‘दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2’ सुरु; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

VMDDP Application 2025 विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDDP) टप्पा २
विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि दुग्ध व्यवसायाला गती मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे.
GR PDF VMDDP Scheme maharashtra विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDDP) टप्पा २
शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीसाठी प्रतिकिलो 3 रुपये अनुदान मिळणार असून, दुधाच्या विक्रीसाठी मराठवाडा दूध उत्पादक कंपनीशी करार करण्यात आला आहे.
विदर्भातील ११ व मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील दुग्ध उत्पादकांना खालील योजनांचा लाभ ऑनलाईन अर्जाद्वारे घेता येणार आहे. योजनांतील विविध घटकांवर २५ ते ७५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार असून, ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत महिला दुग्ध उत्पादक गटांची स्थापना करण्यात येणार असून, त्यांना राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ (NDDB) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आवश्यक तांत्रिक सुविधा, प्रशिक्षण व मार्गदर्शन पुरविण्यात येणार आहे.
विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDDP) टप्पा २ या प्रकल्पांतर्गत योजनांचा माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा खालीलप्रमाणे.
>> उच्च दूध उत्पादन क्षमतेच्या गायी व म्हशींचे वाटप.
>> उच्च उत्पन्नक्षम मृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे वितरण.
>>दोन वेतातील अंतर कमी करण्यासाठी “Fertility Feed” (पशुप्रजनन पूरक खाद्य) पुरवठा.
>> दुधातील फॅट व एसएनएफ वाढविण्यासाठी विशेष खाद्य पूरक पुरवठा.
>> हिरव्या वैरणीच्या टंचाईवर उपाय म्हणून बहुवार्षिक चारा बियाणे व ठोब पुरवठा.
>> विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रे व मुरघास वितरण
>> गायी–म्हशींमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम
>> आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम
पशुपालकांनी विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDDP) टप्पा २ या सर्व योजनांसाठी vmddp.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा,
जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत प्रति व्यक्ती 4 हजार रुपयांचे वैरण बियाणे 100 टक्के अनुदानावर प्राप्त होत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून पशुपालकांनी पशुवैद्यकीय चिकित्सालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#AnimalHusbandry #Maharashtra #पशुसंवर्धन #दुग्धविकास #VMDDP


