Bandhkam kamgar kyc बाबत प्रसारमाध्यमात बातम्या येत असल्याने बांधकाम कामगारमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, यातच आता Mahabocw कडून प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Bandhkam kamgar kyc fact check
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेमार्फत मंडळाचे एकात्मिक संगणक प्रणालीवर मंडळाचे तालुका सुविधा केंद्र/ अन्य कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन प्रकाराने बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येते. नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना योजनांचे निकषांच्या अधीन राहून मंडळाचे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मोफत देण्यात येतात.
यू ट्यूबवरील काही चॅनेलद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या मंडळाचे बांधकाम कामगारांसाठी e-KYC हा व्हिडिओ चुकीच्या माहितीवर आधारित बनविण्यात आला आहे.
व्हिडीओमध्ये दाखविण्यात आल्याप्रमाणे उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने e-KYC संदर्भात दि.०५.११.२०२५ अथवा दि.११.११.२०२५ रोजी कोणताही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही तसेच याबाबत मंडळाचे अधिकृत परिपत्रक / संकेतस्थळावर संदेश प्रसारित केलेले नाही.
तरी बांधकाम कामगारांनी याबाबत अधिकृत माहितीकरिता मंडळाचे संकेतस्थळ www.mahabocw.in अथवा नजीकच्या तालुका सुविधा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
#FactCheck, #शिष्यवृत्ती, #बांधकामकामगार


