Rabbi Pikvima राज्यात रब्बी हंगाम 2025 करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू, शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पिकविमा योजनेत सहभागी व्हावे

Rabbi Pikvima 2025
नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखणे.कृषि क्षेत्रासाठी पतपुरवठ्यात सातत्य राखून उत्पादन जोखीम टाळणे व अन्नसुरक्षेत भर घालणे.हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Rabbi Pikvima योजनेची वैशिष्ट्ये Scheme Features
१. योजना फक्त अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित पिकांसाठी लागू.
२. कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक.
३. भाडेकरू शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक.
४. रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता १.५%, तर नगदी पिकांसाठी ५% ठेवण्यात आला आहे.
५. जोखीम स्तर ७० टक्के निश्चित.
६. मागील सात वर्षांतील सर्वोत्तम पाच वर्षांची सरासरी उत्पादनावर आधारित उंबरठा उत्पादन ठरवले जाईल.
७. मृत अथवा अवैध नावाने घेतलेले विमा प्रस्ताव रद्द होतील.
८. ऍग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे अनिवार्य.
९. ई-पिक पाहणी अंतर्गत नोंद करणे आवश्यक.
१०. बोगस पिकविमा प्रकरणात फौजदारी कारवाई होईल.
११. सीएससी केंद्र धारकास प्रति शेतकरी फक्त ४० मानधन देय असून, शेतकऱ्यांनी यापलीकडे कोणतेही शुल्क देऊ नये.
१२. गहू व हरभरा पिकांसाठी उत्पादन निश्चिती करताना ५०% वजन कापणी प्रयोगावर आणि ५०% वजन तांत्रिक उत्पादनावर दिले जाईल.
Rabbi Pikvima जोखीम व नुकसान भरपाई
पिक पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदींमुळे उत्पादनात घट झाल्यास महसूल मंडळानुसार पिक कापणी प्रयोग किंवा तांत्रिक उत्पादनाच्या तुलनेत नुकसान भरपाई दिली जाईल.
अंतिम मुदत

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत रब्बी हंगाम २०२५-२६ साठी नोंदणी दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, गहू व हरभरा पिकांसाठी अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२५ आहे.


