KCC राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छीमार, मत्स्य व्यावसायिकांना २ लाख रुपयापर्यंतच बिनव्याजी कर्ज, शासन निर्णय निर्गमित

KCC
राज्यात पशुपालन व मत्स्य पालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे, याच पार्श्वभूमीवर राज्यातील KCC धारक मच्छीमार बांधवाना एक दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
४ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील KCC धारक मच्छीमार बांधवांना ४% व्याज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
GR PDF 04.11.2025 KCC for Fisherman
Main Features of scheme
मत्स्यव्यवसायाशी संबंधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या घटकांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे खेळते भांडवली कर्ज सहज उपलब्ध व्हावे आणि त्यावरील व्याजाचा भार कमी व्हावा, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. राज्य शासनाने या माध्यमातून मच्छिमारांना स्थिर आर्थिक आधार देऊन त्यांची उत्पादनक्षमता वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Beneficiaries’ for scheme
मच्छिमार ( KCC धारक असणे आवश्यक ), मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन व मत्स्यबीज संवर्धक, पोस्ट हार्वेस्टिंग क्षेत्रातील वर्गीकरण, प्रतवारी, आवेष्ठन व साठवणूक करणारे व्यावसायिक.
या सर्व घटकांना बँकांमार्फत ₹२.० लाखांपर्यंतचे खेळते भांडवली कर्ज मिळेल. या कर्जावर राज्य शासनाकडून ४% व्याज परतावा सवलत दिली जाईल.
लाभार्थ्याने कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत पूर्ण परतफेड करणे आवश्यक राहील. ही अट पूर्ण केल्यासच त्यांना व्याज परतावा सवलत मिळणार आहे.


