अतिवृष्टी, पूर परिस्थिती मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसेवारी कडे लक्ष लागले आहे, यातच आता जिल्हा प्रशासनाकडून हंगामी पैसेवारी जाहीर करायला सुरुवात केली आहे, जाणून घेऊयात कशी आहे पैसेवारी Paisevari 2025

Paisevari 2025 – Hungami paisevari jahir
खरीप हंगामातील पिकांची एकूण स्थिती, उत्पादनाचा एकंदरीत अंदाज काढण्यासाठी पैसेवारी काढली जाते.
यामध्ये पैसेवारी काढण्याचे ३ प्रकार आहेत.
१. नजरअंदाज पैसेवारी
२. सुधारित पैसेवारी
३. अंतिम पैसेवारी
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नजरअंदाज पैसेवारी काढली जाते तर १५ ऑक्टोबर पर्यंत सुधारित पैसेवारी जाहीर केली जाते.
शेवटी ३१ डिसेंबर नंतर शेवटची अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते.
यामुळे शेतकऱ्यांसाठी पैसेवारीला अत्यंत महत्व आहे.
उपलब्ध हंगामी पैसेवारी खालील प्रमाणे आहे.
सांगली जिल्हा hangami paisevari 2025
मिरज तालुका ७२ पैसे, तासगाव तालुका ६९ पैसे, कवठेमहांकाळ तालुका ६० पैसे, जत तालुका ५४ पैसे, खानापूर तालुका ६८ पैसे, आटपाडी तालुका २६ पैसे, पलूस तालुका ३५ पैसे, कडेगांव तालुका ५६ पैसे, वाळवा तालुका ९८ पैसे तर शिराळा तालुका ९५
छत्रपती संभाजीनगर najarandaj paisevari 2025
संभाजीनगर शहर – ४८.१४ पैसे, संभाजीनगर तालुका – ४७.०० पैसे, पैठण – ४६.११ पैसे, फुलंब्री – ४९.० पैसे, वैजापूर – ४८.०१ पैसे.
गंगापूर – ४८.१५ पैसे, खुलताबाद – ४८.०० पैसे, सिल्लोड – ४८.०० पैसे, कन्नड – ४८.०० पैसे, सोयगाव – ४८.०० पैसे,
एकूण सरासरी – ४७.८४ पैसे.
बुलढाणा जिल्हा

गोंदिया जिल्हा
गोंदिया १५३ गाव ५० पैशापेक्षा जास्त, गोरेगाव ९४ गाव ५० पैशापेक्षा जास्त, तिरोडा १२३ गाव ५० पैशापेक्षा जास्त, अर्जुनी मोरगाव १४८ गाव ५० पैशापेक्षा जास्त
देवरी १२८ गाव ५० पैशापेक्षा जास्त, आमगाव ८३ गाव ५० पैशापेक्षा जास्त, सालेकसा ८६ गाव ५० पैशापेक्षा जास्त, सडक अर्जुनी १०४ गाव ५० पैशापेक्षा जास्त.
एकूण गोंदिया जिल्हा ९१९ गाव ५० पैशापेक्षा जास्त.
यवतमाळ जिल्हा
यवतमाळ जिल्ह्यात फक्त ३ तालुक्यांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे.
पुसद तालुक्यातील १८५ गावांची पैसेवारी ४८ पैसे, उमरखेड तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारीही ४७ पैसे व महागाव तालुक्यातील ११२ गावांची पैसेवारीही ४९ पैसे म्हणजेच ५० टक्क्याच्या कमी काढण्यात आली आहे.
तर यवतमाळ जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यातील पैसेवारी ही ५० पेक्षा जास्त काढण्यात आली आहे.
वाशिम जिल्हा
वाशिम जिल्ह्यातील सर्वच अर्थात ७९३ गावाची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे, वाशिम जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४७ पैसे इतकी आहे.
नांदेड जिल्हा Paisevari
नांदेड ८८ गावे (३४ पैसेवारी), अर्धापूर ६६ (३७), कंधार १२६ (३४), लोहा १२६ (३३), भोकर ७९ (३२.३६), मुदखेड ५५ (३८.५)
हदगाव १३७(३७), हिमायतनगर ६४ (३७), किनवट १९१ (३७), माहूर ८४ (३८), देगलूर १०८ (३६), मुखेड १३५ (३६), बिलोली ९२ (३५), नायगाव ८९ (३५), धर्माबाद ५६ (३२), उमरी ६३ (३५).
अमरावती जिल्हा
अमरावती जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५६ पैसे जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेलं नुकसान पाहता ही पैसेवारी कशी आली हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आता शेतकऱ्यांचे सुधारित पैसेवारी कडे लक्ष असणार आहे.


