KCC 2025 शेतकऱ्यांना कागदपत्र विरहित ऑनलाईन पिक कर्ज

KCC 2025

जनसमर्थ पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारदर्शक सुलभ व कागदपत्र विरहित पिक कर्ज KCC 2025

KCC 2025

KCC 2025 Through Jansamarth Portal

देश भरात शेतकऱ्यांना जनसमर्थ पोर्टलव्दारे किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) / पीक कर्ज मंजुरीसाठी 1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 विशेष मोहिम राबवली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत राज्यातील शेतक-यांना तातडीने किसान क्रेडिट कार्ड KCC पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार व पीएमबी अलायन्स यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केलेला आहे.

भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने ऍग्रिस्टॅक डेटा प्रणालीचे जनसमर्थ पोर्टलशी एकात्मिकीकरण करून शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने , सहज व कागदपत्र विरहित पिक कर्ज उपलब्ध करून दिली जात आहेत.

राज्यातील पोर्टल वरती पात्र दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष केसीसी / पीक कर्ज मोहिम दि. ३१ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत आहे.

देश भरातील शेतकऱ्यांना पिककर्जाची ( KCC ) मंजुरी जलद, पारदर्शक आणि कागदविरहित पध्दतीने मिळावी, यासाठी जन समर्थ पोर्टलचा सुरू करण्यात आलेले आहे.

या पोर्टल मुळे शेतकऱ्यांना बँकाच्या फेऱ्या टाळून घरबसल्या कर्ज मंजुरीची सुविधा उपलब्ध झाली आहे, याच सुविधेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Jansamarth Portal वरती किसान क्रेडिट कार्ड KCC चा लाभ घेण्यासाठी खालील बाबी शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक केलेला असने गरजेचे आहे.

अर्जदार शेतकऱ्याची Agristack Portal वर Farmer ID बनलेली असावी

सध्या हा लाभ फक्त नावावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे.

जनसमर्थ पोर्टलद्वारे KCC मिळविण्यासाठीची प्रक्रिया :

फार्म रजिस्ट्रीमध्ये नोंदणी तपासणे. (आधार क्रमांक/नोंदणी आयडी आवश्यक) https://www.jansamarth.in/home या संकेतस्थळावर मोबाईल नंबर वापरून अर्ज करा.

ॲग्री लोन किसान क्रेडीट कार्ड निवडा आणि केसीसीसाठी पात्रता तपासा. राज्य व जिल्हा निवडा. माहिती वाचून संमती द्या आणि पुढे जा. आधार क्रमांक प्रविष्ट करा व ई-केवायसी तपशील तपासा.

ओळख पडताळणी, बँक खाते तपशील, वैयक्तिक तपशील, आर्थिक तपशील, जमीन व इतर तपशील, अर्ज पुनरावलोकन, बँक निवड. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी बँकेचे निकषानुसार कर्जवाटपाचा लाभ घ्यावा

याचबरोबर पशुधनाच्या आहार, उपचार, विमा आदी  संगोपनासाठी किसान क्रेडिट कार्डाआधारे अल्पकालीन कर्ज मिळते.

पशुधनाचा आहार, वैद्यकीय उपचार, विमा, वीजपुरवठा, इन्व्हर्टर आदी बाबींसाठी खेळते भांडवल म्हणून पशुधनावर १ लक्ष ६० हजार रू. पर्यंत अल्पकालीन कर्ज, तर शेतीवर ३ लक्ष रू. पर्यंत कर्ज मिळू शकते.
या योजनेत सहभाग घेण्यासाठी गरजू पशुपालकांना जनसमर्थ हे ऑनलाईन ॲपवरून आपल्या बँकेला अर्ज करता येईल. त्यासाठी लवकरात लवकर किसान क्रेडिट कार्ड काढावे,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *