
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
13 मार्च 2026 रोजी मोदी आसाम राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३-१४ मार्च दरम्यान २ दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असतील.
PM मोदी कोक्राझारमधील बोडो गडापासून त्यांचा दौरा सुरू करणार आहेत. या दौऱ्यात ते ४५७४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण केले. बीटीसीमध्ये रस्ते पायाभूत सुविधाच्या ११०१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाईल. तसेच कामाख्या-चारलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस, नारंगी-अगरतळा एक्सप्रेस आणि गुवाहाटी-न्यू जलपाईगुडी एक्सप्रेस या तीन नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.
या दौऱ्यादरम्यान ८८३ किमी रस्ते आणि ३६ नवीन पुलांच्या बांधकामासाठी ३२१७ कोटी रुपयांच्या आसाम माला ३.० प्रकल्पाचे भूमिपूजन ही केले जाणार आहे.
याचप्रमाणे मोदी कोक्राझार येथे एका जन रॅलीला संबोधित करणार आहेत
पुढे मोदी कोक्राझारहून गुवाहाटीला जातील जिथे ते ८,८४१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे.
याचप्रमाणे ७८० कोटी रुपयांच्या नुमालीगड सिलीगुडी पाईपलाईन क्षमता अपग्रेडेशन प्रकल्पाचे देखील ते या दौऱ्यात उद्घाटन करतील. या कार्यक्रम प्रसंगी चहा मळ्यातील कामगारांना जमिनीचे पट्टे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दरम्यान याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील ९.३२ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता DBT द्वारे वाटप देखील करतील.
पंतप्रधान मोदी १४ मार्च रोजी सिलचरमध्ये २२,८६४ कोटी रुपयांच्या मेगा सिलचर हाय स्पीड कॉरिडॉरचे भूमिपूजन देखील करणार आहेत.
पीएम किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता
Pradhanmantri Kisan sanman nidhi योजनेच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन तयार करण्यात आलेली आहेत यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ शकते.
PMKisan योजनेसंदर्भात सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी Pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टल तसेच pmkisan official या X handle वर भेट द्यावी असं आवाहन ही करण्यात आले आहे

शासनाकडून देण्यात आलेल्या या सूचनेत “अनोळखी लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका,” असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर काही फसवणूक करणारे लोक बनावट वेबसाईट आणि मेसेजद्वारे शेतकऱ्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. यापासून सावध राहून आपला बचाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.



Pingback: Pm Kisan Ineligibility या शेतकऱ्यांचा हप्ता होणार बंद22