PM kisan अखेर २०व्या हप्त्याची तारीख जाहीर

PM kisan

अखेर २०व्या हप्त्याची तारीख जाहीर, शासनाच्या माध्यमातून PM kisan योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना महत्वाचा इशारा देण्यात आला आहे.

PM kisan

PM Kisan 20th installment date

मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची तारीख शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. आता देशातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना ०२ ऑगस्ट २०२५ रोजी pm kisan योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.

देशातील करोडो शेतकरी PM kisan योजनेच्या 20 व्या हप्त्याचा प्रतीक्षेत असतानाच शासनाच्या माध्यमातून मात्र शेतकऱ्यांना या योजनेच्या संदर्भातील फेक बातम्या व धोकेदायक लिंक पासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Pradhanmantri Kisan sanman nidhi योजनेच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन तयार करण्यात आलेली आहेत यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ शकते.

PM kisan

PMKisan योजनेसंदर्भात सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी Pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टल तसेच pmkisan official या X handle वर भेट द्यावी असं आवाहन ही करण्यात आले आहे

शासनाकडून देण्यात आलेल्या या सूचनेत “अनोळखी लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका,” असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर काही फसवणूक करणारे लोक बनावट वेबसाईट आणि मेसेजद्वारे शेतकऱ्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. यापासून सावध राहून आपला बचाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

1 thought on “PM kisan अखेर २०व्या हप्त्याची तारीख जाहीर”

  1. P M किसान सन्मान योजने चे लाभार्थी हे गावात जिथे शेती आहे अशाच शेतकऱ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे जे शेतकरी शेतात पीक न घेता शहरात बसून किसान पेन्शन घेत आहेत ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. अशा लोकांची पेन्शन बंद व्हायला हवी. जे लोक गावात राहतात त्यांना पेन्शन मिळत नाही पण शहरात राहणारा त्यांचा नातेवाईक मात्र पेन्शन घेतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *