Pikvima Scheme 2025 राज्यात खरीप २०२५ पासून सुधारित पीकविमा योजना

Pikvima Scheme 2025 राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना

Pikvima Scheme

Sudharit Pikvima Scheme 2025

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) अर्थात सुधारित पिक विमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

पीकविमा योजना २०२५ GR येथे पहा  👇👇

Pikvima GR PDF – सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करीता राज्यात राबविणेबाबत

खरीप हंगाम २०२५ या हंगामात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भात (धान), खरीप ज्वारी , बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा इत्यादी साठी पीकविमा भरता येणार आहे.

या मध्ये ज्या महसूल मंडळामध्ये जे पीक अधिसूचित केले असेल त्या अधिसूचित पिकांसाठी ,अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत आपला सहभाग नोंदविता येणार आहे. सुधारित पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी दि. ३१ जुलै २०२५ ही अंतीम मुदत देण्यात आली आहे.

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा agristack farmer id अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नोंदणी क्रमांक असणे गरजेचे आहे तर पीक विमा भरल्यानंतर खरीप हंगामाची ई पीक पाहणी करणे देखील बंधनकारक असणार आहे.

पीकविमा योजना पुढील कंपन्या च्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी

अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा , वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार , परभणी, वर्धा, नागपुर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , हिंगोली,अकोला, धुळे, पुणे, जालना , गोंदिया, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर , भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली

आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरेंस कंपनी

लातूर , धाराशिव , बीड

पिकानुसार विमा संरक्षित रक्कम आणि शेतकरी साठीचा विमा हप्ता रक्कम रु./हे . ही प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी असणार आहे.

अ.क्र.पिकविमा संरक्षित रक्कम रु./हे.अ.क्र. पिक विमा संरक्षित रक्कम रु./हे. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु/हे
1भात9,000 ते ६१,०००122.50 ते १२२०
2नाचणी15,000 ते ४०,०००37.50 ते १००
3उडीद22,000 ते २६,६०० 55.00 ते ५००
4ज्वारी25,500 ते ३३,००० 63.75 ते ६६०
5बाजरी26,000 ते ३२,०००75.00 ते ६४०
6भुईमूग38,098 ते ४५,०००95.25 ते ९००
7सोयाबीन30,000 ते ५८,०००75.00 ते ११६०
8कारळे20,00050
9मूग22,000 ते २८,००० 55 ते ५६०
10कापूस35,000 ते ६०,०००87.50 ते १८००
11मका36,00090 ते ७२०
12कांदा68000 170 ते ३४००
13तीळ27000 67.50
14तूर37,218 ते ४७,००० 93.75 ते ९४०

फसवणुकीच्या घटना टाळा :

कोणत्याही शेतकऱ्याने दुसऱ्याच्या जमिनीवर, शासकीय जमीन, गायरान, मंदिर, देवस्थानावर बोगस पीक दाखवून विमा घेतल्यास अशा प्रकरणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच फसवणूक करणाऱ्या अर्जदारांना पुढील ५ वर्षे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

महाराष्ट्र सरकारने पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. खोटी कागदपत्रे सादर करून योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकले जाणार आहे. यापूर्वी ईतर घटकांवर ही कारवाई केली जायची. परंतु आता शेतकऱ्यांनाही या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरीप हंगामातील पीक विमा काढण्यासाठी शेतक-याने अर्जासाठी अँग्रीस्टॅक नोंदणी, ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असून, ई-पीक पाहणी व प्रत्यक्ष पीक यात तफावत आढळल्यास विमा रद्द होऊ शकतो. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक व स्वयंघोषणा घेऊन अर्ज करावा. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा नको असल्यास अर्ज करण्याच्या ७ दिवस आधी बँकेस लेखी कळवावे.

विमा नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाणार

खरीप २०२५ च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडल/तालुक्यात पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यांस खालील सुत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते. सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकाचे बाबतीत रीमोट सेन्सिंग तंत्रज्ञान द्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के आणि पीक कापणी द्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे . उर्वरित पिकांचे बाबतीत पिक कापणी द्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे .

बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला agristack नोंदणी क्रमांक, ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरुन सहभाग घ्यावा. या शिवाय कॉमन सर्विस सेंटर (CSC) आपले सरकार च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. भाग घेतलेल्या शेतकऱ्याने नंतर ई-पीक पाहणी नोंद पूर्ण करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top