राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात Namo Shetkari योजनेचा सातवा हप्ता वितरित , खात्यात १८९२.६१ कोटी रुपये जमा

PM Kisan 20th installment date
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर “शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मंत्रीमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेशकुमार उपस्थित होते.
केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना सुरू केली. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतक-यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते.
या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतक-यांना प्रति वर्षी बारा हजार रुपये अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत. आतापर्यंत सहा हप्त्यामध्ये ९३ लाख ९ हजार शेतकऱ्यांना ११ हजार १३० कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे.
Pradhanmantri Kisan sanman nidhi योजनेच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन तयार करण्यात आलेली आहेत यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ शकते.

PMKisan योजनेसंदर्भात सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी Pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टल तसेच pmkisan official या X handle वर भेट द्यावी असं आवाहन ही करण्यात आले आहे

शासनाकडून देण्यात आलेल्या या सूचनेत “अनोळखी लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका,” असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर काही फसवणूक करणारे लोक बनावट वेबसाईट आणि मेसेजद्वारे शेतकऱ्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. यापासून सावध राहून आपला बचाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


P M किसान सन्मान योजने चे लाभार्थी हे गावात जिथे शेती आहे अशाच शेतकऱ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे जे शेतकरी शेतात पीक न घेता शहरात बसून किसान पेन्शन घेत आहेत ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. अशा लोकांची पेन्शन बंद व्हायला हवी. जे लोक गावात राहतात त्यांना पेन्शन मिळत नाही पण शहरात राहणारा त्यांचा नातेवाईक मात्र पेन्शन घेतो.